ठाणे : आपल्या मुलीचे एका तरुणाबरोबर प्रेम संबध आहेत हे कळल्या मुळे आणि प्रेम संबंध तोडण्यास सांगितले असता सुद्धा न ऐकल्यामुळे, एका पित्याने आपल्या 22 वर्षीय मुलीचा खून केला व तिचा अर्धा मृतदेह कल्याण येथे टाकून फरार झाला, त्या पित्याला ठाणे गुन्हे शाखा एक ने 30 तासाच्या आत गजाआड केले आहे.
8 डिसेंबरला सकाळी 5:25 सुमारास एक इसम कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेर ऑटो रिक्षा मध्ये मोठी बॅग घेऊन गोवा नाका, भिवंडी येथे जाण्यास बसला परंतु बॅगमधून वास येत असल्याने रिक्षा चालकास त्याचा संशय आला, त्याने त्या इसमास हटकले असता तो बॅग रिक्षा मध्ये टाकून पळून गेला त्या नंतर बॅग खोलून पाहता त्या मध्ये एका महिलेचे कमरेपासून खालच्या शरीराचा कापलेला भाग मिळून आला, त्या बाबत कल्याण महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्यातील मृत महिलेची ओळख पटवून गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते, ह्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे व त्यांची टीम करत होते, तपास करत असताना या गुन्ह्यातील आरोपी याचे मिळालेले सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपी याचा शोध घेत असताना गुन्हे शाखेचे पोलीस नाईक संजय बाबर यांना माहिती मिळाली की ह्यातील आरोपी हा टिटवाळा येथे राहणारा असून त्याचे नाव अरविंद रमेशचंद्र तिवारी आहे, आणि तो पवन हंस लॉजिस्टिक, मालाड मुबंई येथे कामाला आहे, त्या प्रमाणे गुन्हे शाखेने त्याला पकडून ताब्यात घेतले असता त्याने मयत मुलगी ही आपली मुलगी कुमारी प्रिन्सी वय 22 असल्याचे सांगितले, तिचे एका तरुणा बरोबर प्रेम संबध होते, त्यास आपला विरोध होता, आपल्याला अजून तिन मुली असून जर मोठ्या मुलीने प्रेमविवाह केला तर मागच्या तिन मुलींची लग्न कशी होणार, त्यात तिला प्रेमसंबंध बंद करण्यास सांगितले असता तिने नकार दिला या गोष्टीचा राग येऊन आपण मुलीला ठार मारून तिची ओळख पटू नये म्हणून तिचे दोन तुकडे केले व मृत देहाची व्हिलेवाट लावल्याचे कबूल केले.
तीस तासात गुन्ह्याचा तपास करून आरोपीला गजाआड केल्यामुळे ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी ठाणे गुन्हेशाखा युनिट 1 चे विशेष कौतुक केले आहे.
PHOTO GALLERY