ठाणे

अंबरनाथमध्ये “कै. अनंता शंकर पाटील ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे” लोकार्पण

* विरंगुळा केंद्र व सर्व भाषिक वृत्तपत्र वाचनालयाचे पण उदघाटन

* स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांच्या प्रयत्नांना यश

अंबरनाथ दि. ०९ (नवाज अब्दुलसत्तार वणू) अंबरनाथ पश्चिमेकडील कोहोजगांव ग्राऊंड येथे स्थानिक नगरसेवक उमेश अनंता पाटील यांच्या प्रयत्नाने “ज्येष्ठ नागरिक स्टेडियम, विरंगुळा केंद्र व सर्व भाषिक वृत्तपत्र वाचनालयाचा” उदघाटन सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे उदघाटन अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्षा मनिषा अरविंद वाळेकर व अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप नाना पाटील यांच्याहस्ते करून या ज्येष्ठ नागरिक स्टेडियमला “कै. अनंता शंकर पाटील ज्येष्ठ नागरिक कट्टा” असे नामकरण करण्यात आले.
याप्रसंगी अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, मुस्लिम जमातीचे अध्यक्ष हाजी सलीम चौधरी, रामदास पाटील, बांधकाम समिती सभापती करुणा रसाळ पाटील, कृष्णा रसाळ पाटील, नगरसेवक मिलिंद पाटील, पंकज पाटील, सुरेंद्र यादव, मनोज सिंग, सूर्यकांत विलास जोशी, अझरा सिद्धीकी, विकास सोमेश्वर, राहुल सोमेश्वर, सुरेंद्र पाटील, चरण रसाळ, अनिलदादा गायकवाड, यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“कै. अनंता शंकर पाटील ज्येष्ठ नागरिक कट्टा” हा येथील स्थानिक नगरसेवक उमेश अनंता पाटील यांच्या प्रयत्नाने बनविण्यात आलेला असून अंबरनाथमध्ये नव्हेतर ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच असा हा “जेष्ठ नागरिक कट्टा” बनविण्यात आलेला आहे, तर १० रुपयात पोटभर जेवण जर कोठे मिळत असेल तर ते आहे अंबरनाथ, असे “१० रुपयात मिळणारे जेवण आणि जेष्ठ नागरिक कट्टा” पाहिले, तर सर्व जेष्ठ नागरिक हे येथेच येतील आणि अंबरनाथ शहराचे नाव उज्ज्वल होईल, असा शब्दात अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी केले. तसेच अंबरनाथच्या नगराध्यक्ष मनिषा वाळेकर यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!