डोंबिवली ( शंकर जाधव ) वाहतूक कोंडीमुले अनेक वेळेला रुग्णवाहिकेला खूप वेळ रस्त्यावर उभे रहावे लागते. त्यामुळे रुग्न्वाहीकेतील रुग्णाला उपचार वेळेवर मिळण्यास विलंब होते. डोंबिवलीतील डॉन बॉस्को शाळेच्या चार विद्यार्थ्यांनी यावर प्रकल्प केला आहे. वाहतूक कोंडीचा कोणताही परिमाण यामुळे होणार नसून रुग्णवाहिका वेळेवर रुग्णवाहिकेत पोहचू शकते. `इलेव्हीटीटेंड अब्युल्यन्स`असा हा प्रकल्प असून सोमवारी पालिकेच्या विज्ञान प्रदर्शनात सादर केला. परदेशात २०२५ साली `इलेव्हीटीटेंड अब्युल्यन्स` सुरुवात होणार आहे. आपल्या देशातील हायवे आणि मोठ्या रस्त्यावर अश्या प्रकारचा प्रकल्प राबवणे महत्वाचे आहे.
संस्कार शिक्षण संस्था संचलित तोंडवळकर विद्यावर्धिनी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत समूहसाधन केंद्र सी.आर.सी. क्रमांक ८ मोठागाव ठाकुर्ली यांच्यातर्फे तोंडवळकर विद्यावर्धिनी या शाळेत विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या अनेक शाळांनी आपले प्रकल्प सदर केले. डॉन बॉस्को शाळेतील इयत्ता ७ वीतील श्रुती म्हापसेकर,धनिशा पुजारी, शिखा संजीवकुमार आणि समीर म्हापसेकर या चार विद्यार्थ्यांनी यावर `इलेव्हीटीटेंड अब्युल्यन्स` असा आगळा-वेगळा प्रकल्प राबविला आहे.या प्रकल्पानुसार हायवे आणि मोठ्या रस्त्यावर इलेव्हीटीटेंड बनवून त्यावर रुग्णवाहिकेवर धावू शकेल. भविष्यात २०२५ साली अश्या प्रकारची सेवा प्रदेशात सुरु होणार आहे.भारतातही अशी सेवा सुरु झाल्यास रुग्णाना वेळेवर उपचार मिळून त्यांचा जीव वाचू शकतो. डॉन बॉस्को शाळेचे मुख्याध्यापक उमेश सोनावणे आणि शिक्षकांनी या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना मार्गददर्शन केले होते.विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मनसे नगरसेविका सरोज भोईर यांच्या हस्ते करण्यात आले.डोंबिवली पश्चिमेकडील १६ शाळांनी आपले प्रकल्पसादर केले आहेत.वेलंकनी शाळेने स्वच्छ भारत अभियानावर आधारित प्रकल्प सादर केला. या प्रकल्पात पाण्यात कचरा जमा झाल्यास कंटनेरच्या साहाय्याने तो कसा जमा केला जाऊ शकतो हे सांगितले आहे. त्यामुळे जलवाहतूकीचा पर्याय ही उपलब्ध होऊ शकतो. ज्ञानेश्वरी विद्यालयाने इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट या विषयावर प्रकल्प सादर केला. लोकप्रिय विद्यालय प्राथमिक विद्याथ्र्यानी वाहतूकीचे संसाधन यावर प्रकल्प सादर करून हेड्रालिक ब्रीज स्थापन केल्यास जलवाहतूकीला प्रोत्साहन मिळेल असे सागितले. सेंट मेरीज शाळेने मंगलयान आणि ऑक्सफर्ड स्कूलने आजीबाईच्या बटव्यातील औषधावर आधारित प्रकल्प सादर केला. लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालय महापालिकेची शाळा क्रमांक २० मोठागाव, ठाकुर्लीने विजेची बचतीसाठी सौर उर्जा उपाय असल्याचा प्रकल्प सादर केला.