गुन्हे वृत्त

बिबट्याची कातडी विक्री करण्यास आलेल्या दोघांना अटक

 

भाईंदर : मीरा भाईंदर मार्गावरील गोल्डन नेस्ट सर्कल भाईंदर येथे बिबट्याची कातडी विक्री करण्यासाठी आलेल्या दोन् इसमाना नवघर पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे प्रकटीकरण अधिकारी काल पेट्रोलिंग करत असताना त्यांना बातमीदारा मार्फत दोन इसम बिबट्याचे कातडे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार, पोलीस निरीक्षक संपतराव पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांच्या पथकाने गोल्डन सर्कल इंद्रलोककडे जाणाऱ्या रस्तावर सापळा रचला. तेव्हा अंकित जयेश थोरात (२४) राहणार दादरा नगर हवेली व रवींद्र वसंत पटेल (२५) राहणार दादरा नगर हवेली या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेल्या बॅगेची झडती घेतली असता त्यांच्याकडे दहा लाख रुपये किमतीचे बिबट्याची कातडी सापडली. केंद्र सरकारने प्रतिबंध केलेल्या बिबट्या या संरक्षित वन प्राण्याची कातडी आढळून आली सदर प्रकरणी भारतीय वन्य जीव संरक्षण कायदा १९७२ चे कलम ९, ३९,४८ (ए) ४९, ५१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!