उल्हासनगर (गौतम वाघ) : एकीकडे कोवळ्या कळ्यांना नख लावण्याचे प्रकार थांबत नाही, तोच आठ दिवसाच्या अर्भकाला नाल्या जवळ फेकल्याचा प्रकार उल्हासनगर येथील शहाड फाटक रेल्वे कंम्पाउंडच्या हजारे बिल्डिंग समोरील नाल्या जवळ घडला आहे.
बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास सदर प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हे अर्भक पुरुष जातीचे असून, त्याला पिशवीत घालून फेकल्याचे आढळले.संजु चव्हाण हे सकाळी प्रात:विधी करण्या करिता गेले असता,त्या ठिकाणी एका पिशवीत लहान अर्भकाला फेकुन दिल्याची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांच्या मदतीने अर्भकाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहिती नुसार संजु चव्हाण ह्यांनी घटनास्थळी असलेल्या संबंधित प्रकार हा रिक्षातुन एक महिला उतरुन नाल्या नजीक पिशवीत असलेल्या अर्भकाला फेकुन गेल्याचे सांगितल्याने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात भा.द.वी कलम.३१७,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करत रिक्षा चालक व महिलेचा शोध घेत आहे.सदर गुन्ह्य़ाचा तपास पो.उप.निरिक्षक वाघ हे करित आहे.