अंबरनाथ : परिश्रम व जिद्द ठेवल्यास विक्रम सहज रचला जातो.अशी जिद्द अंबरनाथतील युवकाने ठेवली अन ती त्याने पूर्ण केली.
१ मिनिटामध्ये रोहित भोरे या युवकाने तब्बल २१९ पंचेस न-थांबता करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसने विश्वविक्रमाची नोंद केली.
रोहित याने २५ ऑक्टोबर २०१९ रोजी अंबरनाथ शहरात पनवेलकर अकुवामरीन या ठिकाणी ह्या विक्रमाची तयारी केली. यापूर्वी हा विक्रम रोहितने अंबरनाथ मधे २१ जुलै २०१९ रोजी ५१ सेकंदा मध्ये १२० पंचेस चा रेकॉर्ड केला होता हि नोंद इंटरनॅशनल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मधे करण्यात आली होती.
यात अत्यंत महत्वाचे म्हणजे कराटे च्या इतिहासात आत्ता पर्यंत असा अनोखा राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय रेकॉर्ड पहिल्यांदाच रोहित भोरे ह्याने केला आहे.
रोहितचे एफवायबीए सुरु आहे.(अं.न.प) माजी नगराध्यक्ष व नगरसेविका प्रज्ञा रोहित धेंडे,साकेत ज्ञानपीठाचे सचिव साकेत तिवारी,सीइओ शोभा नायर,व्यवस्थापन कॉलेजचे निर्देशक सनोद कुमार, प्राचार्य एस.के.राजू, उपप्राचार्य डॉ.शहाजी कांबळे,क्रीडा शिक्षक राजेंद्र तेल,संजय चौधरी,प्रिया नेर्लेकर,शलाका चव्हाण,मनोज मोरे,यश काळे आदींनी पाठबळ दिले.
रोहितच्या बहिणी या सुध्दा कराटे या क्षेत्रात असून वीणा भोरे व स्वाती भोरे यांनी सुद्धा परिश्रम घेतल्याचे रोहित भोरे यांनी सांगितले.
वर्ल्ड रेकॉर्ड बद्दल रोहित भोरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
१ मिनिटात २१९ कराटे पंचेस अंबरनाथ चा रोहित भोरे ची इंडिया बुक मध्ये नोंद.
