ठाणे

अंबरनाथ पालिकेच्या निवडणुकीत भाजपाचे मिशन २०-२०

* भाजपा युवा तरुणांचा सत्ताबदल संकल्प !

* युवानेता अभिजीत करंजुले-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘अभिजात’ सामाजिक उपक्रमांचा सेतु थेट जनसंर्पकात

अंबरनाथ दि. १२ (नवाज अब्दुलसत्तार वणू) : अंबरनाथ शहारात गेली अनेक वर्षापासुन शिवसेनेची सत्ता आहे, मात्र नियोजित प्रारूप विकासापासुन जनता दुर आहे. १९९२ साली कल्याण महापालिकेतुन स्वतंत्र झालेल्या अंबरनाथ आणि बदलापुर शहरामध्ये तफावत पाहिली, तर आज बदलापुर आपल्यापेक्षा विकासाच्या दृष्टीने दहा-वीस वर्षांनी पुढे गेले आहे. अंबरनाथमधील दैयनिय अवस्था पाहुन भाजपच्या युवा तरूणांनी ठरवल आहे. आगामी चार महिन्यानी येणा-या नगरपालिका निवडणुकांमध्ये जनता जनार्दनांनी देखील ठरवल पाहिजे. “शहराचा विकास कोण करू शकतो, नगरसेवक कसा हवाय, त्या अनुषंगाने अकार्यक्षम नगरसेवक आणि सत्ता घरी बसवली पाहिजे” हे सर्व ध्येय डोळयासमोर ठेवुन “अंबरनाथ शहराचा विकास घडवुया” असा संकल्प भाजपाच्या नवतरूणांनी घेतलाय, तो पुर्णत्वास जाईल असा विश्वास माजी नगराध्यक्ष तथा भाजप नेते गुलाबराव करंजुले-पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार कुमार आयलानी व पदाधिका-यांच्या उपस्थितीत विविध भागात जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन प्रसंगी युवानेता अभिजीत करंजुले -पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

भाजप युवानेता अभिजीत करंजुले-पाटील यांच्या ७/१२ वाढदिवसानिमित्त अंबरनाथ शहरातील विविध भागात संपुर्ण दिवसभरात थेट जनतेत जावुन सामाजिक उपक्रमातुन वाढदिवस साजरा करण्यात आला. भाजपा युवा मोर्चाचे मनेष गुंजाळ, राजेश कौठाळे आयोजित “शेकडो नाका कामगारांना मोफत टिटी (धनुर्वात) इंजेक्शन व फळ वाटप” कार्यक्रमाचा शुभारंभ भाजप नेते गुलाबराव करंजुले-पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष किसनराव तारमळे, विधानसभा अध्यक्ष डाॅ.मनोज कंदोई, माजी शहराध्यक्ष भरत खरे, शहराध्यक्ष भरत फुलोरे, सुनिल सोनी, अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष याकुब मिरा सय्यद, अजित खरात, खानजी धल आदी पदाधिकारी व नगरसेवक उपस्थितीत होते. अंबरनाथ पश्चिम बुबापाडा, संघटन चौक येथे देवेंद्र यादव आयोजित “मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे” उदघाटन भाजप शहर प्रभारी सुनिल सोनी यांनी केले. यावेळी आमदार कुमार आयलानी यांनी अभिजीत करंजुले – पाटील यांना शुभेच्छा दिल्या. डाॅ. दिपा रेड्डी यांच्या टिमने आरोग्य तपासणी केली. बुवापाडा सुदर्शनचौक येथे भगिनींना मोफत साडी वाटप करण्यात आले. यावेळी येथिल नागरिकांनी अभिजीत करंजुले-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांनी केक कापुन जल्लोष केला. कार्यक्रमाचे आयोजन रणदिवे मॅडम व अशोक शहा यांनी केले. यावेळी नगरसेविका जयश्री थेटे, शहरध्यक्ष भरत फुलोरे, सुनिल सोनी तसे भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच अंबरनाथ पश्चिम मेटलनगर येथील आयोजक दत्तात्रय करंजुले यांच्या भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन भाजप नेते गुलाबराव करंजुले- पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच नेताजी मार्केट व फुलेनगर जावसई येथिल भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजप नेते गुलाबराव करंजुले-पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी भगिनींना साडी व धान्यवाटप करण्यात आले. याप्रसंगी युवामोर्चा भाजप प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटील, अझहर कुरेशी, सिकंदर कुरेशी, शंकर रेड्डी, श्रीकांत रेड्डी, माजी नगरसेवक लेलीन मुक्कु आदी पदाधिकारी उपस्थित हेाते.
अंबरनाथ पुर्व भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयात दिलीप कणसे, विश्वासराव निंबाळकर आयोजित “नेत्रहीन बांधवांना काठी वाटप” भाजप नेते गुलाबराव करंजुले-पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष भरत फुलोरे, गटनेते तुळशीराम चौधरी, खानजी धल, माजी नगरसेवक अशोक गुुंजाळ, ओबीसि सेल प्रदेश उपाध्यक्ष अजित खरात, सुनिता लाड आदी मान्यवर उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!