ठाणे

प्रकल्पग्रस्त महिला आघाडी नवी मुंबईतर्फे प्रकल्पग्रस्त महिलांच्या स्पर्धांना उत्कृष्ट प्रतिसाद

बेलापूरः शेतकरी समाज मंदीर हॉल, कोपरखैरणे येथे प्रकल्पग्रस्त महिला आघाडीतर्फे महिलांच्या व युवतींच्या निरनिराळया स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
यावेळी महिलांसाठी रांगोळी, गीतगायन, पालेभाज्यांपासून खाद्यपदार्थ बनविणे, वक्तृत्व स्पर्धा, उखाणे घेणे, युवतींसाठी रांगोळी, धावणे, हस्ताक्षर, मेहंदी काढणे, टाकाऊपासून टिकाऊ वस्तु बनविणे या स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धेचे उद्घाटन आर.एफ.नाईक विद्यालयाचे सुधीर थळे सर, ज्युनियर कॉलेजचे प्रताप महाडिक सर, खारी कळवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मोरेश्वर पाटील, ज्ञानविकास संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. पी.सी.पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. जयश्री पाटील, डी.व्ही.एम.डी.एड. कॉलेजचे प्राचार्य सोनांबळे सर, सहसचिव सौ. छाया वेटा, सौ. प्रभावती प्रकाश पाटील, सौ. लता नाईक, सौ. प्रेरणा पाटील, सौ. सुनिता ठाकूर, सौ. सुनिता पाटील, सौ. धमुबाई वेटा, सौ. शैला म्हात्रे, सौ. विश्रांती पाटील व इतर महिला मंडळाच्या अध्यक्षा व त्यांचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ. जयश्री पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून प्रकल्पग्रस्त महिला आता शिक्षणात, स्पर्धेत निरनिराळया क्षेत्रात वेगवेगळया स्तरावर पुढे आहेतच पण त्यांच्या अंगी असलेल्या कलांना वाव मिळावा व मनमोकळेपणे आपले गुण सादर करावे म्हणून शेतकरी संघटनेने आम्हाला हे व्यासपिठ मोफत दिले आहे. त्याचा आम्ही प्रकल्पग्रस्त महिला पूरेपर फायदा घेऊन महिला पुढे याव्यात हा उद्देश पुढे ठेऊन महिलांनीही या व्यासपिठाचा फायदा घ्यावा असे सांगितले व सर्वांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
मोरेश्वर पाटील यांनी आपल्या भाषणातून सौ. जयश्री पाटील या महिला पुढे याव्यात म्हणून धडपडत असतात. सर्व महिला भगिनींनी त्यांना साथ देऊन लाभ घ्यावा. हे व्यासपिठ प्रकल्पग्रस्त महिलांसाठी नेहमी खुले राहील असे सांगितले व महिलांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सोनकांबळे सरांनीही सर्व महिलांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. अ‍ॅड. पी.सी.पाटील यांनी आपल्या भाषणातून महिला आघाडीची स्थापना कशा प्रकारे झाली याबद्दल माहिती दिली. सर्व महिलांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सुधीर थळे व प्रताप सरनाईक यांनी आपल्या भाषणातून महिला आघाडीच्या कार्याचे व त्यांना साथ देणार्‍या संघटनेचे कौतुक करुन सर्व महिलांना व युवतींना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व मान्यवरांनी स्पर्धांना भेट दिली व महिलांनी निरनिराळे संदेश देणार्‍या रांगोळया (पर्यावरण स्वच्छता, झेंडूच्या फुलांपासून, मिठापासून रांगोळया काढल्या होत्या). या रांगोेळयांनी सर्व उपस्थितांची मने जिंकली.
पालेभाज्यांपासून खाद्यपदार्थ बनविणे, वक्तृत्व स्पर्धा, उखाणे घेणे, युवतींसाठी रांगोळी, धावणे, हस्ताक्षर, मेहंदी काढणे, टाकाऊपासून टिकाऊ वस्तु बनविणे, गीतगायन वगैरे स्पर्धा आयोजित केल्या होत्या. कार्यक्रमाचे पंच म्हणून सौ. शोभा पाटील, सौ. प्रज्ञा म्हात्रे, सौ. जे.एच.पाटील, सौ. साधना पाटील, अहिरराव सरांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. छाया वेटा यांनी केले.
PHOTO GALLERY

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!