डोंबिवली ( शंकर जाधव ) : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात गरीब रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णाशी चर्चा केली.या रुग्णालयात रुग्णांना उपचार वेळेवर आणि योग्य मिळत आहे कि नाही याची विचारपूस केली. यावेळी माजी नगरसेवक नंदू धुळे, ज्येष्ठ नेते उदय शेट्टी,मिलिंद भालेराव,माजी कार्याध्यक्ष राजेंद्र नांदोस्कर, माजी युवक अध्यक्ष डोंबिवली शहर समीर भोईर,ज्ञानेश पवार,शैलेश भोजने,सेवा दलचे स्र्रेश भोसले, विजय जाधव,डोंबिवली जिल्हा समन्वयक सोशल मिडिया निरंजन भोसले, राहुल चौधरी,ओमकार पाटेकर, जगदीश ठाकूर, मनोज सकपाळ, सुनील जाधव, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब रुग्णांना फळे वाटप..
December 12, 2019
86 Views
1 Min Read

-
Share This!