* नाका कामगार व गरीब गरजूंना मिठाई वाटप, अनाथ आश्रमात जाऊन मुलांना फळवाटप
* मोफत आरोग्य तपासणी शिबिराला चांगला प्रतिसाद – सदाशिव पाटील
अंबरनाथ दि. १२ (नवाज अब्दुलसत्तार वणू) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाध्यक्ष तथा कृषीरत्न शरदचंद्र पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ शहर व आरपीआय (सेक्युलर) मित्र पक्ष यांच्या वतीने अंबरनाथ पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे “नाका कामगार व गरीब गरजूंना मिठाई वाटप आणि अनाथ आश्रमात जाऊन मुलांना फळवाटपाचा” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच युनिकेअर हेल्थ सेंटर यांच्या सहकार्याने “मोफत आरोग्य तपासणी व आयुर्वेदिक उपचार शिबिराचे” ही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील व युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांनी केले होते.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील, युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, माजी नगरसेवक कबीर गायकवाड, जिल्हा सचिव सुनील अहिरे, प्रफुल थोरात, अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष पुष्पराज गायकवाड, कार्याध्यक्ष बळीराम साबे (काका), सोशल मिडिया सेल तालुका अध्यक्ष मिलिंद मोरे, विनोद शेलार, महिला शहराध्यक्षा पूनम शेलार, मनिषा भोईर, जुलेखा सय्यद, अर्चना पितळे, कलाताई म्हेत्रे, सुलताना शेख, भगवान महाजन, प्रमोद बोराडे, नामदेवराव गुंडाळे, महेश भोईर, सूर्यवंशी काका यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, यात मिठाई वाटप, मोफत आरोग्य तपासणी शिबिर व अनाथ आश्रमात जाऊन मुलांना फळवाटप करण्यात आले, तसेच युनिकेअर हेल्थ सेंटर यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतल्याची माहिती अंबरनाथ शहाराध्य सदाशिव (मामा) पाटील, युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील आणि महिला शहराध्यक्ष पूनम शेलार यांनी दिली.