ठाणे

धावत्या लोकलमधून पडून तरुण जख्मी ; तीन दिवसातील आतापर्यंतची चौथी घटना

उल्हासनगर(गौतम वाघ) : धावत्या लोकलमधून पडून तरुण गंभीर जख्मी झाल्याची घटना उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ घडलीय. या अपघातात तरुणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीय.

सायमन डोमनिक डीसिलव्हा असे जख्मी तरुणाचे नाव आहे. आज दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर रेल्वे स्थानकामध्ये असलेल्या धोबी घाट परिसरात दरवाजामध्ये उभा असलेला सायमन लोकल मधून अचानक खाली पडला,सायमन हा कुर्ला येथून कॉलेज वरून घरी येत होता ,तो पहिल्या वर्षाचा विद्यार्थी असून स्टेशन जवळ आले म्हणून तो दरवाज्यात उभा होता दरम्यान उल्हासनगर रेल्वे स्थानक जवळ येत असल्याने लोकलचा वेग यावेळी कमी झाला होता,सायमन या अपघातातून बचावला मात्र त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. सायमन उल्हासनगर मधील मराठा सेक्शन येथे राहतो ,स्थानिक समाजसेवक जावेद शेख ह्यांनी रेल्वे पोलिसांनी कळवताच तात्काळ सायमनला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्याठिकाणी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारार्थ कळवा येथील शिवाजी रुग्णालयात हलविण्यात आले आहे

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!