गुन्हे वृत्त

उल्हासनगरात लग्न सभारंभात क्षुल्लक वाद!! नातेवाईकानेच केला नातेवाईवाकाचा गळा आवळुन घात!!

पोलीसांनी तीन तासातच केली अल्पवयीन ओरोपीवर मात!!

उल्हासनगर(गौतम वाघ) : डोंबिवलीतील एकाचे लग्न उल्हासनगरातील मोनिका मॅरेज हॉल मध्ये असताना धक्का लागला या किरकोळ कारणा वरुन एका 25 वर्षीय तरुणाचा दोन अल्पवयिन मुलांनी गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना दुपारी घडली आहे.उल्हासनगर पोलिसांनी अवघ्या तीन तासात अल्पवयिन आरोपिच्या मुसक्या आवळल्या आहेत.
डोंबिवली नांदिवली येथील रवी मंजुळे याचे दुपारच्या सुमारास मोनिका मॅरेज हॉल मध्ये लग्न झाले.लग्नानंतर मंजुळे ह्यांचे नातेवाईक असलेले रवी सुरेश शिंदे आणि दोन अल्पवयिन मुले यांच्यात किरकोळ वाद झाला.या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यावर दोघांनी रवी शिंदे याचा गळा आवळून खून केला आणि पळ काढला.रवी याला मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असता त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यानी मृत घोषित केले.उल्हासनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशील जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन तडाखे यांनी पथका सोबत मानपाड़ा डोंबिवली गाठुन दोन्ही अल्पवयिन आरोपी मुलांच्या मुसक्या आवळल्या आहे.उल्हासनगर पोलीस ठाण्यात अल्पवयीन असलेल्या दोन आरोपी वर भा.द.वी कलम.३०२,३२३,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हाचा तपास सहाय्यक पो.नि महेंन्द्र चौधरी हे करित आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!