कल्याण :- स्केटिंग असो.ऑफ़ महाराष्ट्र च्या मान्यतेने स्केटिंग असो.ऑफ कल्याण तालुका व ठाणे जिल्हा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 15 डिसेंम्बर रोजी कल्याणच्या च्या ट्री हाऊस स्कूल येते *तिसरी कल्याण ट्रॉफी राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा* आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत कल्याण च्या पीएस स्केटर्स क्लब ने 12 सुवर्णपदकासह स्पर्धेचे अंतिम विजेतेपद पटकावले तर मीरा भायंदर च्या संतोष क्लब ने 8 सुवर्णपदकासह स्पर्धेचे उपविजेते पदा चा मान मिळवला. कल्याण च्या सागर क्लब ने 5 पदकासह तृतीय स्थान पटकावले. सर्व विजेत्या *कल्याण ट्रॉफी* व रोख रक्कम अनुक्रमे 5000/- 3000/- व 2000/- देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत महाराष्ट्र तुन 460 खेळाडूनी सहभाग घेऊन स्पर्धेला मोठा दिला. स्पर्धा स्केटिंग च्या पाच विविध प्रकारात खेळवण्यात आली स्पर्धेचे उदघाटन स्केटिंग असोसिएशनचे ऑफ महाराष्ट्र चे उपाध्यक्ष गणेश राव यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले याप्रसंगी विनय वर्मा नॅशनल कनवेनर प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रसार व प्रचार अभियान, श्रीनिवास जाधवर – इन्स्पेक्टर व मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेला पालकांनी मोठा प्रतिसाद दिला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गणेश बागुल, लवेश वैद्य, सागर कुलदीप, पवन ठाकूर, आयप्पा नायडू, रफिक अन्सारी, दुर्वा वैद्य, सानिया भाटिया, मनीषा गावकर, मोहित बजाज, दीपक कुलदीप, विजय म्हात्रे, संतोष मिश्रा, कमलेश सिंग यांनी परिश्रम घेतले.
*स्पर्धेतील काही सुवर्ण विजेते*
5 वर्षाखालील : विवान सिंह हरिधान बारकुल
5 ते 7 वर्षाखालील :- विवान लांगर श्रीमाई जाधव आदिना शहा दीवशांत बाबड श्रीलेखा दास दिव्या बोराडे साम जॉर्ज सिराज सावंत ट्विषा बजाज अद्वैत सावं
7 ते 9 वर्षाखालील :- श्रेया कदम परी चौधरी रुद्रा आधारकर चेतन पडेलकर हीतवी शेट्टे नवाज शेख दिव्यांश जियान लविष शेट्टी जिया चव्हाण गार्गी ठोंबरे
9 ते 11 वर्षाखालील :- तनिषा दळवी रितिका मोटवानी अध्या भरनवाल नील तिवारी अमित शिसोदिया ऋतुजा सरवणकर अक्षरा हरदासी अथर्व बेले रिशांक दिवेदी आरमांश कुमार
11 ते 14 वर्षाखालील :- पार्थ मास्कर अरमान फुलारे अंशवी सिंग अल्तमास खान ओम हुटकर समृद्धी शास्त्रकार स्वरा पाटील
14 ते 17 वर्षाखालील :- मयुरेश खंडू आदिती व्हटकर