ठाणे

मनसे  आमदारपुत्राच्या कारचा अपघात

डोंबिवली : ( शंकर जाधव  ) कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे मनसेचे आमदार प्रमोद ( राजू )पाटील यांच्या मुलाच्या कारचा डोंबिवलीमध्ये अपघात झाला. भरधाव वेगाने उड्डाणपुलावरून थेट कोकण रेल्वे रुळावर कोसळून झालेल्या अपघातात कारचा चक्काचूर झाला. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला.  सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही.

मानपाडा  पोलिस सूत्रांकडून उपलब्ध माहितीनुसार, डोंबिवली जवळच्या कल्याण-शिळ मार्गावरील एक्सपेरीया मॉल ते काटई टोल नाक्यादरम्यान सदर कारचा अपघात झाला. या ठिकाणी असलेल्या उड्डाणपुलावरुन कार भरधाव वेगाने खाली कोकण रेल्वे रुळावर कोसळली. ही कार मनसेचे  आमदार प्रमोद (राजू ) पाटील यांचा मुलगा आदित्य पाटील याची आहे. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांचा मुलगा आदित्य याची ही कार पेट्रोल भरून काटई नाक्याकडून पलावा सिटीच्या दिशेने निघाली होती. एक्सपेरीया मॉल उड्डाणपुलावर ड्रायव्हरचा कारवरील ताबा सुटला आणि कार थेट उड्डाण पुलाखाली असलेल्या कोकण रेल्वे रुळावर कोसळली.या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. खादीर इनामदार ड्रायव्हरने प्रसंगावधान पाहून उडी मारल्याने तो बालंबाल बचावला असल्याचे पोलिसांनी सांगितले.अपघातग्रस्त कार ही मुश्तान्ग कंपनीची आहे

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!