डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पूर्वेकडील खांबाळपाडा येथील ९० फिट रोडवरील साईराज पार्कच्या पलीकडे रस्त्याच्या बाजूला सेल्फी पाॅईट रात्री काही समाजकंटकांनि जाळल्याची घटना घडली. या घटनेने शिवसैनिक प्रचंड संतापले असून अश्या समाजकंटकांवर शिवसेनेने टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.सकाळी डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, परिवहन समिती सभापती मनोज चौधरी, शाखाप्रमुख समीर गायकर यासह शिवसैनिकांनी सदर ठिकाणी पाहणी केली.
शिवसेनेच्या वतीने उभारण्यात आलेल्या डोंबिवलीतील सेल्फी पाॅईटचे ३ वर्षापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते.शहरातील सेल्फीप्रेमी या सेल्फी पाॅईटवर सेल्फी काढण्यास येत असतात.मात्र काही समाजकंटकांना हा सेल्फी पाॅईट डोळ्यात खुपत होता. म्हणून त्यांनी रात्रीच्या वेळी हा सेल्फी पाॅईट जाळला. हा प्रकार समजताच शिवसेना पदाधिकाऱ्यांंना समजताच सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली. काही वेळाने पोलीस ठाण्यात शाखाप्रमुख समीर गायकर यांनी समाजकंटकांवर गुन्हा दाखल केला. याबाबत शहरप्रमुख राजेश मोरे यांना विचारले असता ते म्हणाले, शिवसेनेने उभारलेले हे सेल्फी पाॅईट डोंबिवलीकरांना अतिशय आवडत आहेत.तरुण वर्ग तर या सेल्फी पाॅईटवर सतत सेल्फी काढत असतात. हे समाजकंटकांना बघवल नाही.