ठाणे

स्वयं सहायता समूहातून महिला उद्योजिका तयार व्हाव्यात  – – कोकण महसूल आयुक्त शिवाजीराव दौंड

????????????????????????????????????

कोकण सरस प्रदर्शनाचे उदघाटन ,..

 अर्बन हाट, बेलापूर येथे २४ ते ३० डिसेंबर पर्यंत विक्री व प्रदर्शन

ठाणे दि २४  : महिला सक्षमीकरणासाठी बचतगट समूहाच्या माध्यमातून महिला उद्योजिका तयार करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कोकण  विभागीय महसूल आयुक्त शिवाजीराव  दौंड यांनी केले.

 कोकण विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ते ३० डिसेंबर या कालावधीत कोकण सरस विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन अर्बन हाट, सी.बी.डी. बेलापूर येथे आज संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी आमदार मंदा म्हात्रे यांनी फित कापून प्रदर्शनाचे उदघाटन केले.

यावेळी व्यासपीठावर आमदार रमेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धशाळा समिती सभापती किशोर जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब.भि. नेमाने, रणधीर सोमवंशी, प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, प्रकाश देवऋषी, सह व्यवस्थापकीय संचालक ( म. प ) दिपाली देशपांडे , उप संचालक राज्य ग्रामीण गृह निर्माण कक्ष मंजिरी टकले, उप संचालक म. रा. ग्रा. जि. अ. श्री. जोगदंडे, उप संचालक म. रा. ग्रा. जि. श्री. खंदारे, सहायक आयुक्त विकास मनिषा देवगुणे , मुख्य लेखा व वित्ताधिकारी गीता नागर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत ) अशोक पाटील, उप मुख्य कार्यकारी ( पाणी व स्वच्छता ) छायादेवी शिसोदे, कार्यकारी अभियंता ( लघु पाटबंधारे) माणिक इंदूरकर, कार्यकारी अभियंता ( बांधकाम ) नितीन पालवे, समाजकल्याण अधिकारी रमेश अवचार, कृषी विकास अधिकारी  मनोजकुमार ढगे, आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी श्री. दौंड म्हणाले की, महिलांनी केवळ या प्रदर्शनात विक्री करण्यापुरता ग्राहकांशी संबंध न ठेवता ग्राहक वर्षानुवर्षे तुमच्याकडूनच वस्तू खरेदी करेल असा प्रकारचा ग्राहक वर्ग तयार करावा. गुणवत्ता आणि दर्जा  यांच्या बळावर आपल्या वस्तूंना कायम स्वरूपी मागणी  मिळेल यादृष्टीने सर्व गटांनी प्रयत्न केले पाहिजे.  पर्यंटनस्थळी स्थानिक वस्तूंच्या खरेदीला पर्यंटक प्राधान्य देतात. हे लक्षात घेऊन पर्यटनस्थळी बचतगट वस्तूंचे विक्री केंद्र निर्माण करता येईल  असेही ते म्हणाले. यावेळी आमदार श्री. पाटील यांनी महिलांचे अभिनंदन करत कष्ट करणाऱ्या महिलांना कोकण सरस ,म्हणजे हक्काची बाजारपेठ असल्याचे सांगितले. तर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सोनवणे यांनी स्वयं सहायता समूहाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील महिलांनी केलेली प्रगती अधोरेखित केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रुपाली सातपुते यांनी केले. तसेच स्वयं सहायता समूहाच्या रोशना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

या विक्री प्रदर्शनात ग्रामीण भागातील स्वयं सहायता समूहाच्या महिलांनी  तयार केलेल्या विविध उपयोगी वस्तू या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये उडीद पापड, हातसडीचे तांदुळ, वारली पेटींग, आर्युवेदिक वनस्पती तेल व उत्पादने, सुकी मासळी, ताडगोळे, कापडी बॅगा, मेणबत्ती, निलगिरी तेल, नाचणी भाजणी पीठ, क्रियेटीव्ह पॉटरी, डिझायनर वुडवर्क, तांबे पितळीची भांडी, बांबु वेतकाम, कागदी डिश, काजूगर, कोकम सिरप, आंबा पोळी, पोहयाचे पापड, लोणची, फॅन्सी ज्वेलरी, मसाले, बांबुपासून बनविलेल्या विविध वस्तू, काथ्याच्या वस्तू इत्यादी उत्पादने या प्रदर्शनास विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत.

या विक्री प्रदर्शनात ठाणे-40, पालघर-20, रायगड-20, रत्नागिरी-14, सिंधुदूर्ग-14, इतर विभाग-10 व इतर-7 असे एकूण 105 उत्पादन व 20 खानावळ असे एकूण 125 महिला स्वयं सहायता समूहांनी सहभाग नोंदविला आहे. कोकण सरस प्रदर्शन हे एक अत्यंत नाविन्यपूर्ण ,लक्षवेधी व ग्रामीण संस्कृतीला शहरापर्यत पोहोचविण्याचे अनोखे व्यासपीठ म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे. यामध्ये ग्रामीण महिलांनी  तयार केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तू, अस्सल ग्रामीण भागातील खाद्य पदार्थास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून जास्तीत जास्त प्रमाणात बाजारपेठ मिळू शकेल हा उद्देश असल्याने प्रदर्शन कालावधीत नागरिकांनी सकाळी १० ते रात्रौ १० यावेळेत  विक्री प्रदर्शनास भेट द्यावी.

राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कराचे वितरण

या कार्यक्रमा दरम्यान जिल्हा आणि तालुकास्तरीय राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराने महिला स्वयं सहायता समूहाना सन्मानित करण्यात आले.  यामध्ये पंचशील स्वयंसहायता समूह , कल्याण ( प्रथम ) , श्री कृपा स्वयंसहायता समूह , अंबरनाथ ( द्वितीय ), आदर्श स्वयंसहायता समूह,मुरबाड( तृतीय ) या गटांना जिल्हा स्तरीय पुरस्कराने गौरविण्यात आले.

तर तालुकास्तरीय पुरस्कारामध्ये कल्याण तालुक्यात पंचशील स्वयंसहायता समूह, (प्रथम) श्री. गजानन स्वयं सहायता समूह, नाडगाव ( द्वितीय ) माता रमाई, पोई ( तृतीय ). तर अंबरनाथ तालुक्यातील श्री कृपा, मांगरूळ, ( प्रथम ) प्रचिती सावरे ( द्वितीय) जय मल्हार कुशिवली ( तृतीय ) त्याच प्रमाणे मुरबाड तालुक्यातील आदर्श, असोळे, ( प्रथम ) प्रगती , बळेगाव ( द्वितीय ) भाविक, चासोळे ( बु ) ( तृतीय ) त्याच बरोबर भिवंडी तालुक्यातील श्री राम समर्थ, दुगाड, ( प्रथम ) गावदेवी, प्रगती-कळबोली, ( द्वितीय ) आई, कांबे (  तृतीय ) आणि शहापूर तालुक्यातील ऊर्जा ,खराडे ( प्रथम ) सूर्योदय कुकांबे ( द्वितीय ) शिवशक्ती , सारमाळ (तृतीय) आदी स्वयं सहायता समूहांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

दै. पुढारीचे पत्रकार राहूल क्षिरसागर यांनी उमेद  अभियानाची सर्वोत्कृष्ट प्रसिध्दी केल्याने प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. तर  सुहास बोबडे  यांना (बँक व्यवस्थापक, आय.सी.आय.सी.आय., कल्याण शाखा ) यांना सर्वोत्कृष्ट पत पुरवठाचे जास्तीत जास्त उदिष्ट साध्य केल्याने प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात आले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!