डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पूर्व- पश्चिमेला जोडणारा कोपर पूल दुरुस्तीसाठी चार महिन्यापासून बंद आहे. पुलाचे दुरुस्तीचे काम अद्याप सुरु नसल्याने याचा फायदा एकीकडे वाहनचालकांनी आपली वाहने पार्क करण्यासाठी वापर केला आहे. आता या पुलाचा वापर ३१ डिसेंबरच्या रात्री तळीरामांची पार्टी जोरदार पार्टी होणार आहे. याकडे विष्णूनगर पोलिसांचे दुर्लक्ष होत असून याठिकाणी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोपर पूल बंद झाल्यापासून रात्री ९ वाजल्यानंतर येथील डीपी उघडून पुलावरील पथदिवे बंद करत करतात. त्यानंतर पुलावरच दारू पीत बसलेले असतात. हा प्रकार अनेक दिवसापासून सुरु आहे. याची माहिती मिळताच शिवसेनेचे पदाधिकारी गणेश मोगविरा आणि समाजसेवक विश्वनाथ शोनोय यांनी डीपीला टाळा लावला.याबाबत मोगविरा आणि शेनोय यांनी `आपले शहरशी` बोलताना सांगितले कि, दररोज कोपर पुलावर दारुड्यांचा त्रास सुरु आहे. स्थानिक पुलांनी याकडे लक्ष दिले पाहिजे.कोणीही कारवाई करत नसल्याने या दारुड्याची डेरिंग वाढत चालली आहे. काही महिला कोपर पुलावरून पूर्वेकडून पश्चिमेला पायी चालत जात असतात. त्यांना या तळीरामांचा त्रास होत असतो. नेहमीप्रमाणे ३१ डिसेंबरला रात्री ९ वाजण्यानंतर तळीराम दारू पीत बसणार असून यादिवशी पोलिसांनी या तळीरामांवर कारवाई करावी अशी मागणी डोंबिवलीकर करत आहेत.