ठाणे (प्रतिनिधी ) : बाळाच्या जन्मानंतर काही दिवसातच ते बोबडे बोलू लागते त्या बोबड्या बोलण्याने आई वडिलांसह सर्वच जण आनंदी होतात पण ठाण्याच्या आद्य संदीप गुळदेकर याचे लहानपानापासून ऐकणे आणि बोलणे बंद होते. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आर्थिक साहाय्य केल्यामुळे ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने निराश असलेल्या आद्य आणि पालकांच्या आयुष्यात आज आनंदाचा झरा निर्माण झाला.
ठाण्यातील आद्य संदीप गूळदेकर याला मागील साडे तीन वर्षापासून श्रवणदोषाची समस्या भेडसावत होती. पालकांनी बरेच प्रयत्न केले. शस्त्रक्रियेसाठी होणार खर्च ही मोठा होता. अशा वेळी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या विशेष प्रयत्नाने ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ठाण्यातील नामवंत डॉ.उप्पल यांच्याकडे आद्यचे ऑपरेशन करण्यात आले आहे.
ठाण्याच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या महापालिका आयुक्त श्री.जयस्वाल यांनी विकासकामांसोबतच आद्यच्या ऑपरेशनची जबाबदारी घेऊन पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन दिले आहे. आद्य हा प्रभाग क्र.१३ च्या नगरसेविका सौ.प्रभा बोरीटकर यांचा नातू असून आज महापालिका भवन येथे त्यांनी व आद्यच्या पालकांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.