मुंबई

घाटकोपर जवळ महिलेचा शीर नसलेला मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना

मुंबई: घाटकोपर पश्चिमेला विद्याविहार जवळ एका नाल्याजवळ महिलेचा शीर नसलेला मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेडशीटमध्ये गुंडाळून हा मृतदेह घाटकोपर पश्चिमेतील एका नाल्याजवळ टाकण्यात आला होता. विद्याविहार येथील एसटी वर्कशॉपच्या बाहेर सकाळी साडेनऊच्या सुमारास हा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी घटनास्थळी गेल्यावर पाहिले असता मतदेह शीर नसलेल्या अवस्थेत होता. तसेच पायाचा खालील भागही कापलेला असल्याचे लक्षात आले.

अशाप्रकारे महिलेचा मृतदेह सापडल्यामुळे घाटकोपर परिसरात खळबळ माजली आहे. एसटी वर्कशॉप परिसरात सकाळी स्थानिक नागरिक मार्निंग वॉकसाठी येतात. यावेळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या दोन महिलांनी सर्वात आधी हा मृतदेह पाहिला असल्याचे एका स्थानिकाने सांगितले. आधी कोणीतरी कचरा टाकला असल्यासारखे वाटले. त्यानंतर स्थानिकांनी वर्कशॉपच्या सुरक्षारक्षकांना याबाबत माहिती दिली. सुरक्षारक्षकांनी जवळ जाऊन पाहिले असता बेडशीटवर रक्ताचे डाग त्यांना दिसले. तेव्हा यामध्ये काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आल्यावर तातडीने पोलिसांना कळविण्यात आले.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

ठाणे

ठाणे

देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हरघर तिरंगा अभियान सुरू असतानाच शहापूर तालुक्यातील आद्यक्रांतीकारी राघोजी भांगरे यांच्या समाधी स्थळांची दयनीय अवस्था ?जिल्हाधिकां-याचा सकारात्मक प्रतिसाद !

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!