ठाणे दि 31 :महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखा कल्याण यांच्या वतीने व्यसनांना बदनाम करु या कार्यक्रमाचे आयोजन दीपक हॉटेल समोर, रेल्वे स्टेशन, कल्याण करण्यात आले होते. ‘द’ दारूचा नव्हे, ‘द’ दुधाचा!! ‘चला, व्यसनाला बदनाम करूया’ या मोहिमेअंतर्गत , येथे मोफत मसाले दुधाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती कल्याणच्या निवासी नायब तहसीलदार बांगर मॅडम, महात्मा फुले पोलीस स्टेशनचे चव्हाण ,बडे साहेब, महा. अनिस राज्य कार्यकारणी सदस्य उत्तम जोगदंड, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष गौतम जाधव , जिल्हा सचिव गणेश शेलार, कल्याण शाखा अध्यक्ष डॉ सुषमा बसवंत, कार्याध्यक्ष राजेश देवरुखकर, सचिव सुशील माळी,रत्नागिरी अनिसचे बुवाबाजी संघर्ष प्रमुख संदिप गोवळकर तसेच मोठ्या संख्येने नागरिकासहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचा प्रमुख हेतू दारु न पिता दुध पिऊन नवीन वर्षांचे स्वागत करावे असे अंनिसचे म्हणणे आहे.व्यसनाधीनतेला फाटा देत बलशाली आणि विवेकी भारताचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन महा. अंनिस तर्फे अनेक वर्षे करत आहे. गेल्या काही वर्षांपासून सरत्या वर्षाला दारू पिऊनच निरोप द्यायचा, असा प्रघात पडत चाललेला दिसतो. तरूणाई मोठ्या प्रमाणावर या चंगळवादी चक्रात ओढली जातेय. गेल्या काही वर्षांमध्ये ३१ डिसेंबरला ‘सेलिब्रेशन’च्या नावाखाली युवा पिढीमध्ये मोठय़ा प्रमाणात व्यसन वाढताना दिसत आहे. अनेक युवक-युवती ३१ डिसेंबरला व्यसनाचा पहिला अनुभव घेतात आणि पुढे जाऊन व्यसनाच्या अधीन होतात.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंनिसने व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश दिला आहे.
*PHOTO GALLERY*

