महाराष्ट्र

 श्री प्रकाश संपतराव गायकवाड  यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त परिमंडळ – ५ मधील सर्व पोलीस स्टेशन व सहायक पोलीस आयुक्त कार्यालय SMART आणि ISO बनले मानांकित

पुणे (प्रतिनिधी) : एमपीएससी पीएसआय २००५ व त्यानंतर एमपीएससी डीवायएसपी २००८ परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या श्री प्रकाश गायकवाड यांची सिंधुदुर्ग वरून पुणे शहर पोलिस आयुक्तालयात ४ ऑगस्ट २०१८ रोजी पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली. त्यांची पोलीस उपायुक्त म्हणून काम करण्याची ही पहिलीच वेळ होती. १५ ऑगस्ट २०१८ रोजी पुणे पोलीस आयुक्तालयाची पुनर्रचना करून परिमंडळ – ५ निर्माण करण्यात आले. या परिमंडळाचा पहिला पोलीस उपायुक्त बनण्याची संधी प्रकाश सं. गायकवाड यांना मिळाली.
दैनंदिन पोलीस स्टेशन भेट करताना पोलीस स्टेशनच्या कामात ब-याच उणिवा दिसत होत्या. सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस आयुक्त  यांच्या सहकार्याने परिमंडळातील सर्व पोलीस स्टेशन व सहायक पोलीस आयुक्त  कार्यालय ‘SMART’ व ‘ISO ९००१:२०१५’ मानांकित करण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
अनेक मुद्द्यांवर पडताळणी करुन पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त परिमंडळ – ५ मधील सर्व ६ पोलीस स्टेशन व सहायक पोलीस आयुक्त कार्यालय SMART व ISO मानांकित बनले. परिमंडळ – ५ वरील मानांकन असणारे पहिलेच व एकमेव परिमंडळ ठरले आहे. यासाठी तत्कालिन पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड , सहायक पोलीस आयुक्त, त्यांचे सर्व सहकारी अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष मेहनत  घेतली .

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!