डोंबोवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली व कोपर रेल्वे स्थानकादरम्यान जुना कोपर पूल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला आहे.हा पूल बंद होईन चार महिने उलटले तरी पुलाचे काम सुरु झाले नाही. यामुळे एकीकडे डोंबिवलीकरांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे पुलाच्या कामाच्या श्रेयावरून शिवसेना आणि मनसेत आरोप प्रत्यारोप केले जात आहे.मात्र हा पूल दुरुस्त होऊन अजून ८ महिने लागणार आहे.
२४ सप्टेंबर रोजी कोपर पुल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला होता. पुलाच्या कामाबाबत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर दिरंगाईचा ठपका ठेवण्यात आला आहे.डोंबिवलीकरांना होत असलेल्या त्रासाबाबत मनसेचे कल्याण ग्रामीण आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. तर महासभेत शिवसेनेने यावर आवजा उठवला होता.प्रशासनाने पुलाच्या कामाचे निविदा काढण्यात आल्या असून निविदा मंजूर झाल्यावर ६ महिन्यात पुलाच्च्या दुरुस्तीचे काम पूर्ण होणार आहे.कोपर पुलावर वाहतूक सुरु होण्यास अजून ८ महिने लागणार असले तरी या कामाच्या श्रेयासाठी शिवसेना आणि मनसेत आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरु झाल्या आहेत.याबाबत मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी कोपर पुलाच्या दुरुस्तीसाठी पालिका अधिकारी वेळकाढू भूमिका बजावीत आहेत.त्यामुळे आता मनसेला रस्त्यावर उतरावे लागेल असे सांगितले. तर शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेमुळे हे शक्य झाले असून मनसे नेहमीच `आयत्यावर कोयता`प्रमाणे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असते. तर स्थायी समितीचे सभापती दिपेश म्हात्रे म्हणाले, विकास कामे पूर्ण होत असल्याचे समजताच मनसे त्याच्यामुळे कामे पूर्ण झाल्याचे दाखवत असते. त्यामुळे जनतेने मनसेला जास्त मनावर घेऊ नये. जनतेचा विकास फक्त शिवसेनाच करू शकते. डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या स्वायवॉकचे उद्घाटन करण्यासठी मनसेचे घाईघाईत हा पूल खुला केला होता.
दरम्यान,कोपर व डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान कि.मी.४७/१२ अ येथील कोपर रेल्वे उड्डाणपुलावरील रस्ताचा पुष्ठभाग तोडून पुनबांधणी करण्यासाठी आणि त्याला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे बांधणी कामासाठी सुमारे ९कोटी रुपये निविदा काढण्यात आली आहे.निविदा मंजूर या निविदा मंजूर या कामासाठी सहा महिन्याचा अवधी देण्यात आला आहे.