ठाणे

डोंबिवलीत केंद्र सरकारच्या औद्योगिक धोरण विरोधी निदर्शने..

डोंबिवली : ( शंकर जाधव ) केंद्र सरकारच्या आर्थिक आणि कामगार कर्मचारी विरोधी निषेधार्थ विविध कामगार संघटना, शिक्षक संघटना, विद्यार्थी संघटना यांनी बुधवारी निदर्शने केली. पूर्वेकडील इंदिरा चौकात केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी अटकाव केल्याने निदर्शने आवरती घ्यावी लागली.

   केंद्रीय संयुक्त समितीच्या वतीने देशव्यापी संप पुकारण्यात आला होता. शहरातील लालबावटा रिक्षा युनियन, भारतीय कम्युनिस्टपक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, कम्युनिस्ट पक्ष रेड स्टार, नाका कामगार, स्वभिमानी शिक्षक संघटना यांनी केंद्र सरकारच्या औद्योगिक धोरणा विरोधात एकत्रित येऊन निदर्शने केली. कॉ. संजय संघवी, काळू कोमास्कर, अरुण वेळास्कर, रामदास वायंगडे, नितू गायकवाड, महेश बनसोडे, अक्षय पाठक यांनी निदर्शनात सहभाग घेतला.केंद्र सरकारचा नागरिकत्व सुधारित कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि औद्योगीक, आर्थिक व कामगार धोरण याबाबत केंद्र सरकारवर तोफ डागताना संघवी म्हणाले, संयक्त महाराष्ट्रच्या लढ्यात विविध धर्मियांनी सहभाग दिला होता. एका बाजूला कामगारांचे हक्क हिरावून घेतले जात आहेत. देश विकाल्याल काढला आहे आणि भाजपा सांगत आहे आम्ही राष्ट्रवादी. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीतून मुस्लिमांना बाहेर काढणार का असा सवाल त्यांनी केला. तर काळू कोमास्कर म्हणाले कि, नागरिकत्व सुधारित कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी याबाबत केंद्र सरकारचे धोरण अत्यंत चुकीचे आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू मुस्लिम भेदभावाचे जहाल राजकारण करीत आहते. भाजपचे गुंड विद्यापीठात जावून विद्यार्थ्यांना मारहाण करीत आहेत. सर्व घटकात हिंदूंचे प्राबल्य असतांना भाजपाला हिंदू राष्ट्र निर्माण कशाला करायचे आहे असा प्रश्न केला. या खोट्या हिंदुत्वाला विरोध केला नाही तर आपण बळी पडू.दरम्यान कॉम्रेड नेत्यांची केंद्र सरकार विरोधी निदर्शने व वक्तव्ये चालू असताना स्थानिक पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने जमलेल्या नागरिकांना आश्यर्य वाटले. नेत्यांची भाषणे झाली आणि नंतर घोषणा देताना चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे वरिष्ठ पोलिसांची एन्ट्री होताच पोलिसांनी निदर्शने करणाऱ्या नेत्यासह कार्यकर्त्यांना दम देण्यास सुरुवात केली. या घटनेचे वार्तांकन करण्यास स्थानिक पत्रकार आले असता रामनगर पोलिसांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला.अखेर सोबत असलेल्या पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यावर मोबाईल परत दिला. मंगळवारी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक नारायण जाधव (गुन्हे) यांनी व्यासपीठावरून पत्रकारांना सहकार्य मिळेल असे आश्वासन दिले होते.पण हे त्यांचे आश्वासन दुसऱ्याच दिवशी हवेत विरून गेले.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

ठाणे

ठाणे

देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हरघर तिरंगा अभियान सुरू असतानाच शहापूर तालुक्यातील आद्यक्रांतीकारी राघोजी भांगरे यांच्या समाधी स्थळांची दयनीय अवस्था ?जिल्हाधिकां-याचा सकारात्मक प्रतिसाद !

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!