ठाणे

कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद(राजू)पाटील घेणार केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट !!!

पलावा उड्डाणपूलाच्या कामाला रेल्वेच्या परवानगीची प्रतीक्षा

उड्डाणपूलाच्या कामाच्या मंजुरीला रेल्वेची दिरंगाई

आमदार प्रमोद(राजू)पाटील यांनी घेतली अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक

कल्याण : कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पलावा उड्डाणपूलाच्या काम सध्या कासव गतीने सुरू आहे.मात्र उड्डाणपूलासाठी आवश्यक असणारी रेल्वेची मंजुरीच मिळाली नसल्याने या उड्डाणपूलाच्या कामाच्या दिरंगाई होण्याची शक्यता आहे. यासाठी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली आहे. तर लवकरच केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले आहे.

कल्याण शिळफाटा या मुख्य रस्त्यावरील होणाऱ्या सततच्या वाहतूक कोंडी मधून सुटकेसाठी पलावा येथे नव्या उड्डाणपूलाच्या कामाला सुरुवात झाली आहे.या रस्त्यावरील वाढलेल्या बांधकामांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. याबाबत केडीएमसी कारवाई करत नसल्याची माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. याबाबत तातडीने कारवाई करून एमएस आरडीसीला सहकार्य करावे असे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. तर या प्रकल्पात रस्त्याचे रुंदीकरण होत असल्याने भूमिपुत्रांना त्यांच्या जागेचा मोबादला मिळाला नसल्याने त्यांना तातडीने मोबादला मिळावा यासाठी केडीएमसी आणि ठाणे महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन तोडगा काढणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे. तर शिळफाटा ते काटई रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे बुजवण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. विशेष म्हणजे या रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत टोल बंद ठेवावा,ज्या कालावधीसाठी टोल नाका बंद असणार आहे,त्याची मुदतवाढ देण्यात यावी असे आमदार राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.वाहतूक कोंडी मधून वाहनचालकांची सुटका व्हावी आणि प्रवास जलदगतीने व्हावा यासाठी आमदार राजू पाटील यांनी कामाला गती देण्याची मागणी केली आहे.मात्र या कामात महत्त्वाचा अडथळा निर्माण झाला आहे तो रेल्वेच्या (डि.एफ.सी.सी.) ची परवानगी मिळाली नसल्याने उड्डाणपूलाच्या कामाला दोन ते तीन वर्षे लागण्याची शक्यता आहे.या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते.मात्र उड्डाणपूलाचे काम दिरंगाईने होत असल्याने कामाची दिरंगाई अपघातांना निमंत्रण देत आहे.याच रस्त्यावर राज्यस्तरीय खेळाडू जान्हवी मोरे हिला जीव गमवावा लागला होता.त्यामुळे अश्या किती खेळाडू आणि वाहनचालकांचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.पलावा येथील जुन्या उड्डाणपूलाचे काम रेल्वे करणार होती मात्र रेल्वेने हे काम एमएससारडीसीलाच करण्याची विनंती केल्याची माहिती आहे.व तसे पत्र रेल्वेने एमएसआरडीसीला दिले आहे. याउड्डाण पुलासाठी लागणार आर्थिक खर्च रेल्वे एमएसआरडीसीला देणार आहे. मात्र रेल्वेची परवानगी नसल्याने या उड्डाणपूलाचे काम वर्षभरात कसा पूर्ण होणार ? असा प्रश्न सध्या वाहनचालकांना पडलेला आहे. रेल्वेची परवानगी मिळण्यास उशीर होत असल्याने आमदार राजू पाटील हे लवकरच केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन कामातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

कल्याण ग्रामीण भागातून ठाणे,मुंबई, नवी मुंबई,पनवेलच्या दिशेने कामगार मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात.त्यामुळे या पुलाचे काम पूर्ण झाल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी आणि एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली आहे व युद्ध पातळीवर अडचणी दूर करून काम पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या बैठकीला एमएसआरडीसीचे अधिकारी बोर्डे, केडीएमसीचे वाँर्ड अधिकारी रवींद्र गायकवाड उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!