नव्या उपायुक्त लक्ष्मण पाटील यांनी व्यक्त केली हतबलता…
डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीत अनधिकृत बांधकामांना पेव फुटला असून यावर पालिका अधिकारी वेळीच कारवाई करत नसल्याने अशी बांधकामे करणाऱ्या विकासकांचे साहस वाढले आहे.मात्र जागरूक नागरिकांनी अशी बांधकामे तोडण्यासाठी प्रशासनाला जागे केले असता राजकीय वरदहस्त कारवाई करू देत नसल्याचे समोर आले आहे. अनधिकृत बांधकाम तोडू नये म्हणून दिल्लीतून फोन येतो, राजकीय दबाबही येतो. असे अनधिकृत बांधकाम विभागाचे नवे उपायुक्त लक्ष्मण पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना प्रशासनाची हतबलता व्यक्त केली.
शुक्रवारी उपायुक्त लक्ष्मण पाटील यांनी डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयात प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. यावेळी पाटील यांनी अधिकाऱ्यांबरोबर विभागीय कार्यालयाची पाहणी केली.यावेळी पत्रकारांनी पाटील यांना शहरातील अनधिकृत बांधकाकामांना पेव फुटले असून प्रभाग क्षेत्र अधिकारी का कारवाई करत नाही असा प्रश्न उपस्थित केला. यावर उपायुक्त लक्ष्मण पाटील म्हणाले, अनधिकृत बांधकाकामांवर प्रशासन कारवाई करण्याची माहिती कळल्यावर आम्हाला दिल्लीतून पण फोन येतात.राजकीय दबाब येते असल्याने कारवाई करणार तरी कशी ? अश्या शब्दात त्यांनी प्रशासनाची ह्तबलता व्यक्त केली. फेरीवाला प्रश्नाबाबत पाटील यांनी पालिकेचे कर्मचारी २४ तास तास कारवाई करू शकत नाही. कर्मचारी गेल्यावर पुन्हा फेरीवाले बसतात.केंद्र सरकारकडून शहरातील स्वच्छ सर्वेक्षण सुरु होणार असल्याने शहरातील ठिकठिकाणी लावलेले बॅनर काढण्याचे काम सुरु आहे, शहर स्वच्छ ठेवण्याचे काम प्रशासन करत असून नागरिकांचीही जबाबदारी आहे. मात्र यासाठी सामाजिक संस्था, पत्रकार यांचे सहकार्य मिळत नसल्याची खंत व्यक्त केली.
डोंबिवली विभागीय कार्यालयात रंगरंगोटी..
डोंबिव शहराचे स्वच्छ सर्वेक्षणाची टीम पाहणी करण्यासाठी येणार असल्याने प्रशासनाने डोंबिवली विभागीय कार्यालयात रंगरंगोटी केली.शहरातील कचराप्रश्न, नागरी समस्या, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासएवजी आपले कार्यालयाच्या स्वच्छतेकडे लक्ष दिल्याबद्दल डोंबिवलीकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.