गुन्हे वृत्त

उल्हासनगरात दोन महिन्या पुर्वी झालेल्या खूनाचा उलगडा,सैराटच्या पुनरावृत्तीत!!

बहिणीच्या नवर्याला डोक्यात गोळ्या घालुन हत्या करणाऱ्या मेव्हुण्याला “फेसबुक काँलिंगच्या” माध्यमातून अटक!!

विठ्ठलवाडी पोलीसाची कौतुकास्पद कामगिरी..

उल्हासनगर(गौतम वाघ)– उल्हासनगर कॅम्प ४ येथील प्रज्ञा करुणा मुकबधीर विद्यालयाच्या पटांगणात भरत चंद्रकांत लष्कर ह्या २२ वर्षीय तरुणाच्या डोक्यात गोळी मारून गळा चिरणाऱ्या त्याच्याच साला अलताफ शेख याला सापळा रचून विठ्ठलवाडी पोलिसांनी पुणे येथून अटक केली. या प्रकरणात यापूर्वी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

उल्हासनगर कॅम्प ४ मधील प्रज्ञा करुणा मुकबधीर विद्यालयाच्या पटांगणात 4 नोव्हेंबरच्या रात्री १० च्या सुमारास एक टोळके नशा करीत बसले होते. या टोळक्यात भरत चंद्रकांत लष्कर हा त्याचा मित्र आनंद राजू सोनावणे बरोबर बसला होता. त्यावेळी त्या ठिकाणी कृष्णा कुंभार, अभिजीत बोडके, अलताफ शेख, सिद्धार्थ पासवान आणि उदय भाटकर हे पाच जण पण बसले होते. त्यावेळी अलताफ शेख याने त्याच्या जवळच्या पिस्तूलाने भरतच्या डोक्यात गोळी झाडली. खाली कोसळलेल्या भरतचा तीष्ण हत्याराने सिद्धार्थ पासवानने गळा चिरल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. त्याला स्थानिकांनी उल्हासनगर कॅम्प ३ च्या साई क्रिटीकेअर ह्या रुग्णालयात दाखल केले आहे. त्यावर उपचार सुरु असताना भरतचा रात्री २ च्या सुमारास मृत्यू झाला होता.
याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात भादवी कलम ३०२, ३४ भारतीय हत्यार कायदा ३,२५ सह मपोका ३७(१),१३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. विठ्ठलवाडी पोलीस, गुन्हे प्रकटिकरण शाखेच्या पोलिसांनी तपासाला दिशा देत कृष्णा कुंभार, उदय भाटकर आणि अभिजीत बोडके उर्फ कलरला अटक केली. मात्र

अलताफ हा विठ्ठलवाडी पोलिसांना गुंगारा देत होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक हर्षल राजपूत हे गुन्हे अन्वेषण पथकाच्या मदतीने तपास करीत होते. हत्येची घटना घडल्यापासून प्रत्येक दिवशी अलताफ शेख हा ठिकाण बदलत होता. तसेच तो फेसबुक कॉलिंगच्या माध्यमातून संपर्क साधत असल्याने त्याचा ठावठिकाणा लावणे कठीण होत होते. मुंबई, गुजरात, जयपूर, उत्तर प्रदेश, नेपाळ, कलकत्ता, हेद्राबाद असा पोलीस त्याचा मागोसा घेत होते. पण प्रत्येक ठिकाणी तो निघून गेल्यावर पोलीस पथक पोहचत असल्याने अपयश हाती येत होते. अखेर पुणे क्राईम ब्रँचच्या पोलिसांसह विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक हर्षल राजपूत, पोलीस नाईक राहुल काळे,यांनी गुन्हे प्रकटिकरणाचे निलेश तायडे, पांडुरंग पथवे, रोहिदास बुधवंत, नाना मोरे, पोलीस शिपाई समीर गायकवाड, हरेश्वर चव्हाण, वैजनाथ राख, यांनी त्याच्या पथकासह धाब्यावर मित्राबरोबर बसून जेवत असताना त्याला ताब्यात घेतले.

आरोपी अलताफ शेखला न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अलताफ शेख यास विठ्ठलवाडी पो.स्टे. ने अत्यंत हुशारीने आणि चातुर्याने अटक करून विठ्ठलवाडी पो.स्टे.च्या कारवाईत अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गुन्हेगार हा कितीही हुशार असला तरी पोलीसांपुढे त्याची हुशारी कमीच पडते आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकतोच हे विठ्ठलवाडी पो.स्टे.चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे ह्यांच्या मार्गदर्शनात नेमणुक करण्यात आलेले गुन्हे प्रकटिकरणाचे पोलीस उपनिरिक्षक हर्षल राजपुत व पोलीस नाईक राहुल काळे ह्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!