ठाणे

केडीएमसीच्या आगामी निवडणुकीत भाजप- मनसे युती होण्याचे संकेत..  

 डोंबिवली ( शंकर जाधव ) राज्यात शिवसेना-भाजप युतीत बिनसल्याने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार का असा प्रश्न सर्वाना पडला आहे. मात्र शिवसेनेचे पालिकेवर आजवरचे वर्चस्व पाहता पालिकेवर आपली सत्ता आणण्यासाठी यंदाच्या निवडणुकीत मनसे पक्षाला बरोबर घेईल का अशीहि चर्चा सुरु आहे.त्यामुळे पालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि मनसे युती होण्याची संकेत दिले जात आहेत. भाजपच्या माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी डोंबिवलीत एका कार्यक्रमात यावर आपले मत व्यक्त करताना मनसे –भाजपची युती झाल्यास भाजपचा महापौर होईल असा विश्वास व्यक्त केला.

डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी येथील गणपती मंदिर जवळील भाजप कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी नंदू परब आणि महिला ग्रामीण मंडळ अध्यक्षा मनीषा राणे यांची निवड करण्यात आली. यावेळी माजी मंत्री जगनाथ पाटील,आमदार रविंद्र चव्हाण,शशिकांत कांबळे,माजी प्रदेश सदस्य के.आर.जाधव, कल्याण जिल्हा माजी उपाध्यक्ष मोरेश्वर भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी आपल्या भाषणात केडीएमसीच्या आगामी निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना कामाला लागा असा सल्ला दिला. ते पुढे म्हणाले, मनसेचे पुढे काय भविष्य आहे हे माहित नाही. तरी मनसे-भाजप युती होऊ शकते.भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम सुरु केले तर डोंबिवली पूर्व, पश्चिम, डोंबिवली ग्रामीण, कल्याण पूर्व ,पश्चिम आणि कल्याण ग्रामीण अश्या सहा मंडलात भाजपचे ६५ ते ७० नगरसेवक निवडणूक येतील असा विश्वास व्यक्त केला. तर आमदार चव्हाण म्हणाले,शहरी आणि ग्रामीण भागाचा समतोल राखणारे नंदू परब आहे. तर डोंबिवली ग्रामीण मंडल महिला अध्यक्षा मनीषा राणे म्हणाल्या, भाजप पक्ष वाढीसाठी भरपूर मेहनत घेईन. माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांना पत्रकारांनी मनसे- भाजप युती झाल्यास भाजपला सत्ता मिळू शकेल का असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, मनसेला कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणुकीत जनतेचे भरभरून मतदान केले. तर डोंबिवलीतहि चांगलीच मते मिळाली. मनसे –भाजप युती झाल्यास याचा फायदा होऊ शकेल.मनसेची मते भाजपला मिळतील आणि भाजपची मते मनसेला मिळेल.मनसेला या निवडणुकीत चांगलीच उभारी मिळेल

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!