डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण डोंबिवली येथील लहान मुलांना पाळीव प्राण्यांची प्रचंड आवड आहे पण लहान घर असल्यामुळे आणि आई-वडील पुरेसा वेळ देऊ न शकल्यामुळे लहान मुलांची पाळीव प्राण्यांची हाऊस पूर्ण होऊ शकत नाही लहान मुलांना प्राण्यांविषयी संवेदना निर्माण व्हावे व त्यांना निरनिराळे डॉग पाहता यावे यासाठी प्रीमियम पेट्स आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली अप्टाउन यांच्या संयुक्त विद्यमानाने डोंबिवलीत रविवारी स.वा.जोशी शाळेच्या पटांगणात डॉग शोचे आयोजन करण्यात आले आहे.
या शो मध्ये विविध जातीचे असंख्य तीनशेहून अधिक डॉग भाग घेणार आहेत. निरनिराळ्या प्रकारचे मजेदार कपडे घालून स्टेजवर डॉग त्यांच्या मालकांची बरोबर फॅशन शोमध्ये भाग घेणार आहेत.बर्फाळ प्रदेशातील सायबेरियन हस्की उंदराच्या आकारातील सर्वात लहान चुवाहुआ डॉग अफगाणिस्तानमधील अफगान हौंड माउंटन विभागातील सेंट बर्नार्ड सर्वात उंच ग्रेट डेन आणि पोलिसांकडे असणारे लाब्राडोर असे निरनिराळे प्रकारचे तीनशेहून अधिक डॉग बघायला मिळणार आहेत. जर्मन शेफर्ड रॉटविलर डॉबरमॅन डॉग यांचे काही थरारक प्रात्यक्षिके ही दाखवण्यात येणार आहे या कार्यक्रमाला पोलिस दलातील पोलिस डॉग ही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मागील वर्षी या कार्यक्रमाला पाच हजारहून जास्त प्रेमींची उपस्थिती होती. या शो मध्ये मिस्टर एशिया २०१८ १९०० मानकरी हितेन मार्के यांचा जाहीर सत्कार तसेच मिस्टर इंडिया सिद्धांत जयस्वाल याचा गुणगौरव, बिग बॉस आणि पुढचं पाऊल या टीव्ही सिरीयल मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री जुही गडकरी आणि अभिनेत्री हेमांगी कवी ही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा प्रकल्प प्रमुख सुधीर यमगर 9821381552 यांना संपर्क करावा.