ठाणे

मोखाड्यातील हिरवे -पिंपळपाडा आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा गळफास लावून आत्महत्या 

मोखाडा  (दीपक गायकवाड) : तालुक्यातील हिरवे पिंपळपाडा आश्रमशाळेत जांभूळमाथा येथील  नववीत शिकणाऱ्या सुनिल चंदर खांडवी (वय15 ) या मुलांने शाळेतील मुलींच्या बाथरूम मध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे  सदरची घटना रविवारी दुपारी घडल्याची माहीती मिळत आहे
   सोमवारी सुनीलची आई सकाळी त्याला भेटण्यासाठी गेली असता मुख्यधापकांनी सांगितले त्याला मी कालच सुट्टी दिली आहे परंतु सुनील घरी आला नसल्याने हा प्रकार चव्हाट्यावर आला असल्याचे समजते तर अधीक्षक आणि मुख्यधापकाना समोर आणल्यावरच आम्ही प्रेत ताब्यात घेऊ असा पवित्रा नातेवाईकानीं घेतल्याने आश्रमशाळा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
   या प्रकरणाचा अधिक तपास मोखाडा पोलीस करीत आहेत..

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!