डोंबिवली ( शंकर जाधव ) महाराष्ट्र जनरल मजदूर संघटना महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळील लादी नाका येथील नाका कामगारांचे आरोग्य शिभीर संपन्न झाले. या शिबिरात फुफुसाची, कानाची, डोळ्याची, रक्त, शुगर, कावीळ, किडनी, पोट, मलेरीया, लघवी, थाॅयराईड,रक्तातील लोहाचे प्रमाण, लिव्हर,रक्तातील मॅग्नेशियम तपासणी करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसळ यांनी दिली. या तपासणीत एखाद्या कामगाराला आजार झाल्याचे आढळल्यास सरकारकडून दीड लाख रुपये उपचारासाठी मदत म्हणून दिली जाणार आहे. मुंबईतील जे.जे.हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत नाका कामगारांना डोळ्याचे आजार आणि काही कामगारांना सिमेंटची एलर्जी असल्याचे समोर आले.त्यामुळे नाका कामगारांना या आजारावर औषध्ये देण्यात आली असली तरी नाका कामगारांनी काम करताना आपल्या डोळ्याची काळजी घेतली पाहिजे असे यावेळी डॉक्टरांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र युवा अध्यक्ष नामदेव भानुशे,सचिव रामदास घुले, केंद्रीय कमिटी सदस्य कैलाश काकडे, नाका अध्यक्ष रामेश्वर शेजळ यासंह अनेक पदाधिकाऱ्यांनी अथक मेहनत घेतली.
डोंबिवलीत नाका कामगारांचे आरोग्य शिबीर संपन्न
January 21, 2020
73 Views
1 Min Read

-
Share This!