वडोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागात पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे आणि प्रदुषणाबद्दल व नागरिकांच्या त्रासाबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे एम.आय.डी.सी. तसेच प्रदूषम नियामक मंडळ यांचेकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे. या रसायनाच्या उग्र दुर्गंधामुळे डोंबिवली परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून यामधून रोगराईची किंवा घातक द्रवे पाण्यात मिसळण्याची शक्यता तसेच वायूप्रदूषणामुळे नागरिकांचे जीव धोक्यात जाण्याची ही शक्यता असल्याची माहिती खा.डॉ. शिंदे यांनी दिली. व संबधितांना तातडीचे निर्देश देऊन नागरिकांचा एमआयडीसी विरुद्ध उद्रेक होणार नाही व होणारे प्रदूषण थांबविण्यात यावी अशी मागणी खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचेकडे केली
डोंबिवलीत प्रदूषण थांबवण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंकडे मागणी
January 23, 2020
48 Views
1 Min Read

-
Share This!