गुन्हे वृत्त

पुर्ववैमन्यसातून मध्यरात्रीत युवकाची निर्घुन हत्या!! अवघ्या २४ तासात पोलीसांनी शिताफीने केली अटक

धुरू बार मधील आर्केस्ट्रा च्या नावाखालील छमछम पुन्हा प्रकाश झोतात?काही वर्षांपूर्वी च्या हत्येची पुनरावृत्ती? 
उल्हासनगरात पुन्हा एकदा “मंगळवार” सञ सुरु.
उल्हासनगर (गौतम वाघ)  मुंबई मध्ये नाईटलाईफ आरंभ करण्यावरून सुरू असलेले राजकीय रणकंदनास लाजवेल असे नाईटलाईफ उल्हासनगर शहरात गेली अनेक वर्षांपासून सर्रास पणे सुरू असून त्याचे परिणामस्वरूप, ह्या शहराचे   नावलौकिक व नामकरण गुन्हेगारी शहरात झाले आहे. नवीन वर्षाच्या पदार्पणातील उल्हासनगरात दुसरी हत्या असुन,
काल रात्री आर्केस्ट्राचा नावाखाली चाललेल्या धुरू बार मधील बाचाबाचीचे पर्यावसान एका युवकाच्या निर्घृण हत्येत झाला आहे.प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी एक हत्येचे सत्र लगातार १७ हत्ये पर्यंत सुरू असलेल्या ह्या शहराचा काळा व गुन्हेगारीचा इतिहास, हा मुंबई च्या गँगवॉर ला देखील लाजवणारा आहे. मंगळवारच्या हत्ये मुळे, त्याचीच पुनरावृत्ती होऊ पाहते काय, असा प्रश्न मनामनात डोकावत आहे. दिपक भोईर नामक युवक रा. माणेरे गाव, हा नेहरू चौक स्थित धुरू बार मधिल पंजाबी नावाच्या मैञिनीने बोलावण्या वरून गेला असता, आधीच बार मध्ये उपस्थित मंडळीं बरोबर त्याची हमरीतुमरी होऊन,भांडणे बार च्या खालपर्यंत जाऊन तिथे दिपक चा पाठलाग करीत ६/७ युवकांनी त्याच्या वर धारदार शस्त्रांनी सपासप वार करून हल्ला केला. त्यात दिपकचा जागीच मृत्यू झाला. हा सगळा प्रकार सी सी टी वी मध्ये कैद झाला आहे. दरम्यान उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात उपस्थित दिपक च्या नातेवाईकांनी त्याचे शरीर ताब्यात घेण्यास नकार दिला होता. हा नियोजनपूर्वक कट असून, घरून बोलावून त्याची हत्या करण्यात आल्याचे सांगून, कठोरात कठोर कारवाई करून न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
 *विठ्ठलवाडी पोलीस ठाणे व*
*उल्हासनगर पोलीस ठाण्याची संयुक्त कामगिरी*
दिपक भोईर ह्यांची हत्या करुन हल्लेखोर लगेच पसार झाले.त्यांना अटक करणे म्हणजे उल्हासनगर पोलीस ठाण्यातील पोलीसां समोर फार मोठे आव्हान होते.सदर गुन्हाचा तपास करणारे उल्हासनगर पो.स्टे चे पो.नि एस.एस.गोरे यांच्या समोर फरार आरोपींना पकडने अवघड होते.सदर आरोपींना अटक करणे साठी ACP डि,डि.टेळे यांनी विठ्ठलवाडी पो,स्टे.चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रमेश भामे ह्यांना सहकार्य करण्याचे आव्हान केले.त्यानुसार रमेश भामे ह्यांनी गुन्हे प्रकटीकरणाचे पो.उप.निरिक्षक हर्षल राजपुत,पो.नाईक राहुल काळे,पो.शिपाई समीर गायकवाड  ह्यांना नेमुन उल्हासनगर पो.स्टे.च्या स्टाफ सोबत फरार आरोपीच्या तपास कामासाठी निघालेल्या पथकाने त्यांच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस करुन त्यांचा पाठलाग सुरु केला परंतु फरार आरोपी त्यांना प्रत्येक ठिकाणी चकवत चकवत शेवटी ते धुळे येथील लाँज मध्ये असल्याची माहिती विठ्ठलवाडी पो.स्टे.च्या कर्मचाऱ्यांना मिळाले वरुन त्यांनी तडक धुळ्यातील लाँजवर धाड टाकली परंतु तेतुनही आरोपी पसार होऊन इंदोरच्या दिशेने निघाले असल्याची माहिती मिळताच तपास पथकाने त्वरीत लक्झरीच्या पाठलाग करुन आग्रा रोड महामार्गावर धुळ्या पासुन ४/५ कि.मी अंतरावर आरोपी पळुन जात असलेल्या लक्झरीला थांबवुन विठ्ठलवाडी पो.स्टे.चे हर्षल राजपुत,राहुल काळे,समीर गायकवाड व इतर कर्मचारी यांनी जलद हालचाल करुन लक्झरीत प्रवेश केला.आरोपींची धरपकड करत असतांना चारही आरोपींनी सदरील पथका बरोबर झटापट करुन फरार होण्याचा प्रयत्न केला माञ आरोपी यात यशस्वी होऊ शकले नाहीत आणि पोलोसांनी जिवावर उदार होऊन या चारही ओरोपीच्या मुसक्या आवळुन अटक केली.
बाँलीवुड फिल्म सारखी हि घटना असुन हल्लेखोरांनी हल्ला करुन फरार होतात आणि पोलीस त्यांचा तसाच पद्धतीने शोध घेतात.अवघ्या २४ तासात फरार आरोपीच्या मुसक्या आवळुन अटक केल्यामुळे विठ्ठलवाडी पो.स्टे चे पो.उप.निरिक्षक हर्षल राजपुत,पो.नाईक राहुल काळे,पो.शि समिर गायवाड व उल्हासनगर पो.स्टे चे पो.उप निरीक्षक सचिन शिंदे,पो.ना मिलिंद बोरसे,पो.शि धनंजय सांगळे व सदर कर्मचाऱ्यांना आरोपीचे लोकेशन वेळोवेळी देत असलेले पो.उपायुक्त कार्यालयातील पो.नाईक किरण चौधरी यांचेवर कौतुकाचे वर्षाव होत आहे.
सदर गुन्हातील आरोपी हे गुन्हेगार प्रवृत्तीचे असल्याचे पोलीसांचे म्हणने असुन ह्यात मुख्य आरोपी नरेश उर्फ बबल्या चव्हाण,व त्याचे साथीदार राजु कनोजिया,योगेश लाड,अनिकेश उर्फ चिकु शिरसाठ,यांना धुळे येथुन पकडण्यात आले. व दोन ओरोपी ह्यांना विठ्ठलवाडी पो.ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणाचे  पो.नाईक रोहीत बुधवंत ह्यांनी अटक केली.राहुल कनोजिया व ह्रतिक उर्फ नन्या भिवसाने असे आरोपीचे नाव असुन सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!