गुन्हे वृत्त

अल्पवयीन मुलीशी लगट आली अंगलट!!

“रंगीला” स्टोर मालकाचा “रंगीला” कारनामा.
भरत तोलानी असे दुकान मालकाचे नाव..
उल्हासनगर(गौतम वाघ)  दुकानात चॉकलेट घेण्या करिता आलेल्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील हावभाग करून तिच्याशी लगट करणाऱ्या दुकानदाराच्या हा प्रकार अंगलट आला आहे.या दुकानदाराचे नाव भरत तोलानी असून 50 वर्षीय तोलानी ला उल्हासनगर पोलीसांनी विनयभंग, पोक्सो कायदा अंतर्गत अटक केली आहे.
भरत तोलानी याचे रंगीला स्ट्रोर नावाचे दुकान आहे. काल राञी सव्वा नऊच्या सुमारास एक बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी चाँकलेट  घेण्या करिता दुकानात गेली असता,दुकानाच्या आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहुन दुकान मालकाने अल्पवयीन मुलीशी अश्लिल गैरवर्तन करत तिच्या विनयभंग केला. घटलेली सर्व हकीकत मुलीने परिचारिकाला सांगितल्यावर त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर आरोपी भरत तोलानी ला अटक करत त्याच्यावर भा.द.वी कलम ३५४ पोक्सो कायदा अंतर्गत ४,८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर आरोपीला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र बांबळे हे तपास करित आहेत.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!