भविष्यात उल्हासनगरात भाजप मनसे एकञ येण्याचे संकेत?
उल्हासनगर(गौतम वाघ)- उल्हासनगर महानगरपालिकाच्या कालच्या महासभेत उल्हासनगर भाजपा अध्यक्ष,नगरसेवक जमनु पुरस्वानी,प्रदिप रामचंदानी यांनी राज ठाकरे हे हिंदूत्वाकडे वाटचाल करत मनसेचा झेंडा बदलुन भगवा केल्या बद्दल अभिनंदनाचा ठराव सभागृहा समोर ठेवला.यावर उल्हासनगर शिवसेना शहर प्रमुख,नगरसेवक राजेंद्र चौधरी व स्विकृत नगरसेवक अरुण आशान यांनी आक्षेप घेत कुणाही पार्टीचे अथवा नेत्याच नाव सभागृहात घेऊ नये,असे भाजपाला खडेबोल सुनावले.यावर उपमहापौर भगवान भालेराव यांनी प्रस्तावा बाबत सभागृहाचा अवमान करुन काय “फालतुगिरी” चालु आहे असे सभागृहातील विरोधी बाका वरील नगरसेवकांना उच्चार केले.
भाजपा अध्यक्ष तथा नगरसेवक जमनु पुरस्वानी,प्रदिप रामचंदानी,महेश सुखरामानी यांनी जोरदार आक्षेप घेत मतदानाची मागणी केली.त्यावर सत्ताधारी शिवसेना नगरसेवकांनी मागार घेत महापौर लिलाबाई आशान यांना प्रस्ताव पास करण्याचे सांगितले.मनसेचा एकही नगरसेवक नसातानाही सदरचा प्रस्ताव मनपा सचिव प्राजक्ता कुलकर्णी यांनी पास झाला असल्याचे सभागृहाला सांगितले.भविष्यात महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुक भाजपा आणि मनसे एकञीतपणे निवडणुक लढवण्याचे संकेत काल झालेल्या महासभेतील सभागृहात दिसुन आले आहे.