गुन्हे वृत्त

अश्लिल नृत्यावर नाच करत असलेल्या “तु मुझे कबुल मैं तुझे कबुल” च्या “खुदा गवाह” ह्या गाण्याच्या  ENTRY वर  विठ्ठलवाडी पोलीसांची अँपल बारवर धाड.!!

शहरातील डान्सबार मुळे पुन्हा उल्हासनगर चर्चेत!!
थरारक खुना नंतर आता १० बारबाला सह मँनेजर वेटर अटकेत!!
उल्हासनगर(गौतम वाघ)  मागील आठवड्यात खूनी सत्रांची मालिका अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या धुरू बार मध्ये किरकोळ बाचाबाची मूळे झालेल्या तिसर्‍या खूनप्रकरणी, एका युवकाचा जीव गेला. त्याचीच पुनरावृत्ती उल्हासनगर – ४ येथील श्रीराम चौकातील डान्सबार मूळे प्रत्यय होणार काय?  असा प्रश्न सध्या नागरिकां मध्ये रोषपूर्ण रित्या केली जात आहे.उल्हासनगर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीसांनी काल राञी श्रिराम चौकातील आँकेस्टाच्या नावाखाली चाललेल्या छमछम अँपल डान्स बारवर धाड मारली,या वेळी “तु मुझे कबुल मैं तुझे कबुल” च्या “खुदा गवाह” या हिंदी गाण्यावर १० बारबाला तोकडे कपडे अंगात घालुन अश्लिल हावभाव इशारे करत वृक्षस्थळाचे अंगप्रदर्शन करुन ठिकठिकाणी डान्स बारमध्ये बसलेल्या गिऱ्हाईकासमोर अश्लिल नृत्य करीत असतांना मिळुन आले. या वेळी बार मॕनेजर प्रमोद गुप्ता वेटर सत्यम दास,जिवन बबु रजक कुमार व १८ ते २५ वर्षीय वयोगटातील १० बारबालांना  पोलीसांनी अटक केली आहे.
त्याच्यावर भा.द.वी कलम २९४,३४ सह महाराष्ट्र पो. अधिनियम क्रं.११०,११७,१२९ अश्लिल नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व महिला प्रतिष्ठान संरक्षण करण्याबाबतचा अधिनियम २०१६ चे कलम ८ अन्यवे प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन वरिष्ठ.पोलिस.निरिक्षक.रमेश भामे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.उपनिरिक्षक हर्षल राजपुत.आर.आर.पाटील, गुन्हे प्रकटिकरणाचे कर्मचारी पो.हवा.भास्कर पालवे.पो.ना. निलेश तायडे,नाना मोरे पो.शि.समिर गायकवाड यांनी अँपल डान्स बारवर धाड मारत कारवाई केली.सदर गुन्हाचा तपास पो.हवा. भास्कर पालवे हे करित आहे.
दिवसेंदिवस उल्हासनगर शहरात ऑर्केस्ट्रा च्या नावाखाली वाढत चाललेले लेडीज डान्स बारमुळे गुन्हेगारी वाढीस लागत असून, त्यावर कसा तरी आवर घातला गेला पाहिजे, अन्यथा उल्हासनगर मधील उगवती पिढी छम छम च्या नादी लागायला वेळ लागणार नाही.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!