* येणार्या काळात तुमचं मत राष्ट्रभक्तीलाच द्या-आमदार रविंद्र चव्हाण
अंबरनाथ दि. २९ (नवाज अब्दुलसत्तार वणू)
“येणार्या काळात सर्वच निवडणुकांमध्ये तुमचं मत राष्ट्रभक्तीसाठी असेल, मतदान फुकट घालवू नका” खासदारकी आमदारकीला हेतुपुरसर धनुष्यबाणाला मतदान केलं मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या मातोश्रीची आता दुसरी मातोश्री निर्माण झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीने इतका मोठा भ्रष्टाचार केला. शेवटी त्यांच्याच पक्तीत जाऊन बसले असा शिवसेनेला चिमटा घेत भाजपाची विचारधारा वेगळी आहे. सर्वांना बरोबर घेवुन जाण्याची विचारधारा आहे. केंद्रामध्ये पारदर्शकता आहे मात्र राज्यामध्ये पारदर्शकता संपली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहा वर्षाच्या कार्यकाळात सर्जीकल स्ट्राइक पासुन ३७०, तीन तलाक, सीएए, एक देश एक रेशन कार्ड अशा अनेक ऐतिहासिक निर्णयाबरोबर सर्वसामान्य दीनदुबळ्यांसाठी राबविलेल्या अनेक योजनाची माहिती घरोघरी पोहचवा, गैरसमज दुर करा, लोक आपोआप परिवर्तन घडवतील, येणार्या अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकित भाजपाचाच झेंडा फडकणार असे मला अभिवचन हवयं अशा कडक शब्दात माजी पालकमंत्री तथा आ. रविंद्र चव्हाण यांनी अंबरनाथमध्ये आयोजित विभागीय कार्यकर्ता बैठकित कार्यशाळा घेतली. यावेळी पुर्वमंडळ शहराध्यक्ष अभिजीत करंजूले पाटील यांच्या नेतृत्वाखाली कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, भाजप नेते गुलाबराव करंजूले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आ. चव्हाण यांच्याहस्ते शेकडो महिला व तरुणांनी भाजपात जाहिर प्रवेश केला.
अंबरनाथ नगरपालिकेच्या येत्या दोन महिन्यात होवु घातलेल्या सार्वत्रिक निवडणूकीत भाजप मिशन ३० प्लस पार करण्याचा चंग बांधला आहे. नवनिर्वाचित पुर्व व पश्चिम मंडाळाचे शहराध्यक्ष अभिजीत करंजूले पाटील व राजेश कौठाळे यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे.आजीमाजी पदाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली नवतरुण पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या पाठबलावर भाजपाच्या योजना घरोघरी पोहचविण्याचा आम्ही सर्वातोपरी प्रयत्न करु असे या दोन्ही शहराध्यक्षांनी वचन विभागिय कार्यकर्ता बैठकीचे मास्तर आमदार रविंद्र चव्हाण यांना दिले. यावेळी त्यांनी आपला विरोधक कोण असा थेट सवाल कार्यकर्त्याना करत आपला विरोधक काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना पण आहे. म्हणून लोकांना सत्य मेव जयते सांगायच. आम्ही लोकांची कामे करायची त्यामुळे आमचा विजय हा नक्की आहे. आपलं मत फुकट जाणार नाही हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घरोघरी जावुन सांगितले पाहिजे असा सल्ला आ. रविंद्र चव्हाण यांनी यावेळी दिला.
आ. रविंद्र चव्हाण, आ. किसन कथोरे, कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, भाजप नेते गुलाबराव करंजूले पाटील यांचा कार्यकर्त्यांना गाठीभेठी अनुषगांने स्वानंद हॉल येथे क्र. ३३,३४,४५,४६, वॉर्डाची आढावा बैठीकेचे आयोजन श्रीकांत रेड्डी यांनी केली होते. शिवाजीनगर येथील जैन समाज हॉल येथे वॉर्ड अध्यक्ष विश्वास निबांळकर व दिपक कोतेकर यांनी वॉर्ड क्रमांक ४४,५२,५३,५४,५७, ची विभागिय बैठकीत शहराध्यक्ष अभिजीत करंजूले पाटील यांच्या नेतृत्वाखाली वरीष्ठ नेत्याच्या मार्गदर्शनाखाली गणेश गुंजाळ यांच्यासह ५२ तरुणानी तसेच तानाजीनगर मधील महिलामंडळ, वॉर्ड क्रमांक ५७ मधुन रेणूका कांबळे, कविता तांबे आणि त्यांच्या सहकारी महिला व हॉटेल व्यवसायिक दिवाकर शेट्टी आदि शेकडो महिला पुरुष व तरुणांनी आ. रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते सन्मान पुर्वक भाजपात प्रवेश घेतल्याने पुर्वभागात भाजपात उत्साही वातावरण दिसत आहे.
मोहनपुरम हॉल येथे राजेश नाडकर, दत्ता देशमुख, प्रभाकर भोईर, अनिता भोईर , सुजाता भोईर, आषिश भोईर आयोजित विभागिय कार्यकर्ता बैठकित आ. रविंद्र चव्हाण, कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी मौलिक मार्गदर्शन केले. नवतरुणांना अध्यक्ष पदाची संधी दिली आहे. आजीमाजी पदाधिकार्यांना सोबत घेऊन “हर हर मोदी,घर घर मोदी” सरकारच्या योजनांची माहिती पोहचवा असे आवाहन आमदार रविंद्र चव्हाण यांनी केले. या बैठकी दौर्यात मोरिवली पाडा येथे संतोष वंदाल आयोजित भारतीय जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि मोतीराम पार्क येथील अजित खरात यांच्या कार्यलयाचे उद्घाटन आ. रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिलीप कणसे यांनी केले.