ठाणे

भूमिअभिलेख कार्यालयाच्या हुकूमशाहीविरोधात आंदोलन

डोंबिवली ( शंकर जाधव  ) जूनी डोंबिवली येथील स्थानिक भूमिपुत्र जगदिश ठाकुर यांनी काही महिन्यांपूर्वी शेतजमीन मोजणीसाठी कल्याणच्या भूमि अभिलेख कार्यालयात रितसर अर्ज करून शासकीय फी भरणाही केला. परंतु या कार्यालयाने तांत्रिक अडचणींमुळे मोजणी होऊ शकत नसल्याचे सांगून खोटा अहवाल बनवून तो निकाली काढल्याच्या निषेधार्थ अर्जदार जगदिश ठाकुर यांनी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. मात्र महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यालय प्रमुख तथा उपधिक्षक प्रमोद जरग यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठाकूर यांनी तूर्त हे आंदोलन मागे घेतले आहे.
         शासकीय फी भरूनही जमिनीच्या प्रत्यक्ष मोजणीच्या दिवशी भूकरमापक दुपारपर्यंत मोजणीच्या ठिकाणी आले नाहीत. हे पाहून जगदिश ठाकुर यांनी कल्याण मोजणी कार्यालय गाठून सदरील वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले. तेव्हा अर्जदारच जागेवर नसल्याचे पाहून भूकरमापक निघून आल्याचे कळविण्यात आले असता अर्जदार ठाकूर यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे जगदिश ठाकूर यांनी जमिन मोजणीसाठी पून्हा पुनर्भेट फी भरून मोजणीची शासकीय फी भरली. यावेळी काही भूकरमापक मोजणीसाठी प्रत्यक्ष जागेवार आले परंतु तांत्रिक अडचणींमुळे मोजणी होऊ न शकल्यामुळे उप अधिक्षक प्रमोद जरग यांनी मोजणी अर्जदार यांना संबंधीत जमीन मोजणीची आवश्यकता नाही असा खोटा अहवाल बनवून प्रकरण निकाली काढले. सदर प्रकरणात भूमिअभिलेख उपअधिक्षकांकडून दोन आदेश काढल्यामुने हे प्रकरण जेव्हा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीस गेले. तेव्हा उच्च न्यायालयाने चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश ठाणे जिल्हा भूमि अभिलेख अधिक्षक बाळासाहेब वानखेडे यांना देऊनही उप अधिक्षक प्रमोद जरग यांनी अनेक महिन्यांतरही अहवाल सादर केला नाही. या प्रकरणी माहिती अधिकारात चूकीची व दिशाभूल करणारी माहीती दिली. त्यामुळे राज्य माहिती आयुक्तांनीही उप अधिक्षक प्रमोद जरग यांना शपथपत्र सादर करण्याचे आदेश देऊनही वरिष्ठांच्या सुचनेला केराची टोपली दाखवली. झालेल्या अन्यायाविरूद्ध वाचा फोडण्यासाठी व उपअधिक्षक प्रमोद जरग यांच्या बडतर्फीसाठी जिल्हाधिकारी ठाणे कार्यालयासमोर २६  जानेवारी या प्रजासत्ताकदिनी अन्यायग्रस्त जगदिश ठाकूर आमरण उपोषणाला बसले. तेव्हा सर्व पक्षिय युवा मोर्चाचे सल्लागार संतोष केणे व गणेश म्हात्रे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रत्यक्ष निवेदन देऊन उपधिक्षक प्रमोद जरग यांची चौकशी करून बडतर्फ करण्याचे लेखी आश्वासन दिले तेव्हा त्यांच्या उपस्थितीत ठाकूर यांनी उपोषण मागे घेतले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!