डोंबिवली ( प्रतिनिधी ) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीदिनी गांधीच्या विचाराचे स्मरण होण्यासाठी कल्याण- डोंबिवली शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी आणि सेवा दलाच्या वतीने गुरुवारी डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात एक दिवसीय उपोषण करण्यात आले.सायंकाळी डोंबिवली पत्रकार संघ २०२० चे अध्यक्ष शंकर जाधव आणि सचिव नरेंद्र थोरवडे यांच्या हस्ते उसाचा रस पिऊन उपोषण सोडले.
या उपोषणात सेवा दल जिल्हा अध्यक्ष पाॅली जेकन,जिल्हा उपाध्यक्ष सुनील चव्हाण,जनरल सेक्रेटरी संतोष चंद्रापिने, युवा सेवा दलचे जिल्हा अध्यक्ष श्रेयस सिंग, तालुका जनरल सेक्रेटरी ग्रामीणचे राम प्रताप सिंग, सेवा दल जाईंट को.ओरडीएटर आर.डी.ठाकूर,यासह सुकुमारन नायर, कॉंग्रेस नगरसेविका हर्षदा भोईर,कॉंग्रेस जिल्हा सेक्रेटरी अंथोनी फिलीप,जिल्हा उपाध्यक्ष बिजू राजन,माजी नगरसेवक रवी पाटील, नवीन सिंग,वर्ष शिखरे आदि उपस्थित होते.आजच्या तरुण पपिढी स्वांतत्र्यकरिता बलिदान केलेल्या शेकडो स्वतंत्रवीर, सत्याग्रही व त्यांच्या विचार यांचे स्मरण होण्यासाठी, महापुरुषांनी केलेल्या बलिदानाची माहिती व्हावी व अहिंसा व देशभक्ती जागृत व्हावी, गांधीचे विचार, तत्वे यांची आजही देशाला गरज आहे. यासाठी महात्मा गांधींचे विचार, बलिदान, अहिंसा, सत्याग्रह याची आठवण करून देण्यासाठी उपोषण केल्याचे यावेळी माजी नगरसेवक नवीन सिंग,रवी पाटील आणि पाॅली जेकन यांनी सांगितले.सायंकाळी ५ वाजता डोंबिवली पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर जाधव यांनी सचिव नरेंद्र थोरवडे यांच्या हस्ते उसाचा रस पिऊन उपोषण सोडले