ठाणे

आता “कुष्ठरोगाविरुध्दचे हे अखेरचे युध्द”

ठाणे  : ठाणे जिल्ह्यात कुष्ठरोग व क्षयरोग जनजागृती  मोहिम राबविण्यात येत आहे.हि मोहिम 13 फेब्रुवारी पर्यंत सुरु राहिल.सर्व तालुक्यामध्ये ग्रामपंचायत स्थरावर आयोजित  ग्रामसभेत कृष्ठरोग व क्षयरोग याचे यांचे जिल्हाधिकारी याचे आवाहन तसेच प्रतिज्ञा वाचन करण्यात येत आहे. “कुष्ठरोगाविरुध्दचे हे अखेरचे युध्द”हे  या अभियानाचे घोषणावाक्य आहे.

 या मोहिमेमध्ये ग्रामिण व शहरी भागात जनजागृती मध्ये शाळा व महाविद्यालये सहभागी झाले आहेत.रॅली,प्रश्नमंजूषा,महिला मंडळ मेळावे गटसभा,चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,खाजगी वैद्यकीय व्यायवसायिक कार्यशाळा,पटनाटय इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

संपुर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांचे कृष्ठरोग व क्षयरोग विषयाचे घोषणापत्र,सरपंचाचे कुष्ठरोगाविषयी भाषण,कृष्ठरोग व क्षयरोग प्रतिज्ञा वाचण करण्यात येणार आहे.

त्वचेवरील बऱ्याच दिवसांचा फिकट व लालसर न खाजवणारा न दुखणारा व सुन्न बधीर चट्टा,कानाच्या पाळया जाड होणे,तसेच तळहात,व तळपायाला सुन्नपणा,शारीरीक विकृती,तेलकट लालसर गुळगुगुळीत चमकदार त्वचा ही कुष्ठरोगाची लक्षणे आहेत.यासाठी एम.डी.टी ही औषधे प्रभावशाली (गुणशाली)असून ती सर्व शासकीय व निमशासकीय दवाखान्यात  व ना.आ. केंद्रावर मोफत आहेत.

दोन आठवडयाहून अधिक खोकला,दोन आठवडयाहून अधिक कालावधीचा ताप,वजनात घट,भुक न लागणे,मानेवर गाठी येणे या पैकी कोणतेही एक लक्षण असल्यास संशयित क्षयरुग्ण समजावा.

कृष्ठरोगांसाठी संजय गांधी निराधार,इंदिरा गांधी आवास योजना,अंत्योदय योजना,अपंगत्व प्रमाणपत्र,घरकुल योजना,ङिपी.एम.आर .सेवा व पुर्नरचनात्मक शस्त्रक्रिया इत्यादी शासकीय योजनाचा लाभ देण्यात येत आहे.

क्षयरुग्णांसाठी आरोग्य संस्थेत खाजगी दवाखान्यात प्रत्येक रुग्णाला प्रतिमाह 500 रुपये व खाजगी डॉक्टरांसाठी क्षयरुग्णाचे निदान करुन क्षयरोग केंद्रात रुग्णांची नोंद केल्यास 500 रुपये व उपचार पुर्ण झाल्याची नोंद केल्यास पुन:श्च 500 रुपये.नविन क्षयरुग्ण कळवून संदर्भित केल्यास संबधीत व्यक्तीच्या बॅक खात्यात 500 रुपये जमा केले जातील.

कुष्ठरोग व क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास नजिकच्या शासकीय आरोग्य केंद्रामध्ये संपर्क करावा असे आवाहन सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग तथा क्षयरोग अधिकारी डॉ. गीता काकडे यांनी केलेआहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!