डोंबिवली ( शंकर जाधव ) भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या नगरसेविका हर्षदा भोईर यांच्या वतीने प्रभाग क्र.५७ जयहिंद कॉलिनी येथील जनसंपर्क कार्यालयात हळदीकुंकू सभारंभ संपन्न झाला.यावेळी प्रभागातील महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. हळदीकुंकू करणे हे जिवाच्या दृष्टीने जास्त लाभदायक असते.हळदीकुंकवाच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात् आदिशक्तीचीच पूजा करत असतो. हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील श्री दुर्गादेवीचे अप्रकट तत्त्व जागृत होते. श्रद्धापूर्वक हळद-कुंकू लावणार्या जिवासाठी कार्य करते.हळदीकुंकू करणे, म्हणजे एकप्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे. हळदीकुंकवाच्या माध्यमातून जीव एकप्रकारे दुसर्या जिवातील देवत्वाची पंचोपचारातून पूजाच करत असतो. हळदीकुंकू आणि वाण देणे आदी विधीतून जिवावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास, तसेच ईश्वराप्रती जिवाचा भाव वाढण्यास साहाय्य होते.वाण देतांना नेहमी पदराच्या टोकाचा वाणाला आधार देऊन देतात. वाण देणे, म्हणजे दुसर्या जिवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे. पदराच्या टोकाचा आधार देणे, म्हणजे अंगावरील वसनाच्या आसक्तीचाही त्याग करून देहबुद्धी त्यागण्यास शिकणे. हा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणातून देवता लवकर प्रसन्न होऊन जिवाला इच्छित फलप्राप्ती होते, म्हणजेच दान सत्कारणी लागते जाते.
कॉंग्रेस नगरसेविका हर्षदा भोईर यांच्या वतीने प्रभागात हळदीकुंकू सभारंभ
February 4, 2020
49 Views
1 Min Read

-
Share This!