वर्धा : वर्ध्यात हिंगणघाट येथे एका धक्कादायक प्रकार घडला आहे. हिंगणघाट येथील चौकात महाविद्यालयात शिक्षिका असलेल्या तरुणीला भरचौकात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यात भाजलेल्या तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही तरुणी सकाळी कामावर जाण्यासाठी निघाली असताना आरोपीने या तरूणीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी आरोपी विकी नगराळेला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपी विक्कीला टाकळघट परिसरातून अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
या हल्ल्यात तरुणी ३५ टक्के भाजली आहे. तिचा चेहरा पूर्णत: भाजला आहे. तरुणीच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर धूर गेल्याने तिची वाचा देखील गेली आहे. तसेच तिची दृष्टीही राहिल की नाही, अशी शंका डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. तिच्यावर सध्या नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती चिंताजनक आहे.