डोंबिवली ( शंकर जाधव ) डाँ. श्री .नानासाहेब धर्माधिकारी यांनी राज्यातील हजारो उध्वस्त होणारे संसार वाचवले आहेत .त्याच्या नावाचे प्रवेशद्वार ग्रामस्थांना प्रेरणा देईल असे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. डोंबिवली जवळील भिवंडी तालुक्यातील वेहेळे गावात उपजिल्हाप्रमुख व नगरसेवक डॉ. देवानंद थळे यांनी स्वखरचाने नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार व शिवाजी महाराज स्मारक यांचे लोकार्पण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते. याच गावातील घाट बांधण्यासाठी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी निधी दिला होता. तसेच गावातील दलित वस्ती व समाज हॉलचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील ,सेनेचे नेते कृष्णकांत कोंडलेकर ,आ शाताराम मोरे ,जि परिषद अध्यक्ष दीपाली पाटील सरपंच वैशाली देवानंद थळे ,व अनिता पाटील ,देवानंद थळे शाखाप्रमुख नवीन थळे ,यांचेसह शिवसैनिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नानासाहेब धर्माधिकारी यांनी उध्वस्त संसार वाचवले
February 4, 2020
448 Views
1 Min Read

-
Share This!