गुन्हे वृत्त ठाणे

भिवंडीच्या धाडसी दरोड्याची 72 तासात उकल…. म्होरक्याकडून सव्वा कोटींचा ऐवज हस्तगत

ठाणे : पहाटेच्या सुमारास बंगल्यात घुसून बंदुकीच्या धाकाने धाडसी दरोडा टाकून दरोडेखोरांनी सोन्याच्या ऐवजासह एक कोटी 86 लाखांचा मुद्देमाल पळवला होता.भिवंडीतील काल्हेरमध्ये 30 जानेवारी रोजी दिवसाढवळ्या पडलेल्या या दरोड्याने ठाणे पोलिसांसह संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता.मात्र,चाणाक्ष पोलिसांनी अहोरात्र तपास करून अवघ्या 72 तासात या दरोड्याचा छडा लावला आहे.पोलिसांनी दरोड्यातील म्होरक्या धर्मेश रणछोड वैष्णव (38) रा.ऐरोली याच्या मुसक्या आवळून सव्वा कोटींचा ऐवज हस्तगत केला.ठाणे न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.घटनास्थळाचे सीसी टिव्ही फुटेज आणि मोबाईल सीडीआरच्या माध्यमातून या गुन्ह्याचा यशस्वी तपास करणाऱ्या दोन्ही पोलीस पथकांना प्रत्येकी 25 हजारांचे पारितोषिक जाहीर केले आहे.अशी माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

भिवंडी,काल्हेर येथील गोदाम मालक व बांधकाम व्यावसायिक जगदीश पाटील यांच्या घरात 30 जाने.रोजी पहाटेच्या सुमारास सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता.पाटील पहाटे मॉर्निंग वॉकला गेल्याची संधी साधून घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी बेडरूममध्ये झोपलेल्या पाटील यांच्या पत्नी व मुलीला बंदुकीचा धाक दाखवून दोरीने त्यांचे हातपाय बांधले.नंतर तिजोरीतील 60 लाखांची रोकड व 421 तोळ्याचे सोन्याचे दागीने असा 1 कोटी 86 लाखांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले होते.या गुन्ह्याची माहिती मिळताच नारपोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!