पनवेल ः मेकअप आर्टीस्ट प्रगती ठाकूर यांच्या ‘ब्युटी ड्रीम’ मेकअप-हेअर अॅकॅडमीचा शानदार शुभारंभ पनवेल तालुक्यातील मोहोपाड्यामध्ये नुकताच झाला. ‘रसायनी नाक्यावर’ फेम सुप्रसिद्ध गायिका, गीतकार अश्विनी जोशी हिच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. गायिका अश्विनी जोशी हिने आपली उपस्थिती दर्शवून ‘ब्युटी ड्रीम’ मेकअप-हेअर अॅकॅडमीला शुभेच्छा दिल्या. मोहोपाडा, रसायनी परिसरातील मुली, महिलांना मेक अप क्षेत्रातील प्रशिक्षण येथे देण्यात येणार आहे. ‘ब्युटी ड्रीम’ मेकअप-हेअर अॅकॅडमीच्या माध्यमातून मुली, महिलांना नवी संधी मिळणार आहे, असा विश्वास उद्घाटक गायिका अश्विनी जोशी हिने व्यक्त केला.
गायिका अश्विनी जोशी हिचे गाणी सध्या विशेष गाजत आहेत. रसायनी नाक्यावर, रसायनीचे स्टार, वलगण लागली नदीला, पोर चालली सासरला, क्रिकेटर नवरा, यो पोरगा माझ्याव मरतय, तेरे बीन अशा अनेक गाण्यांनी तरुणाई आणि सार्यांनाच अक्षरशः तिने वेड लावले आहे. त्यामुळे उद्घाटनासाठी उपस्थित असलेल्या मुलींनी गायिका अश्विनी जोशी हिच्यासोबत एक सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती. आपला जादुई आवाज, नृत्य आणि अदाकारांनी सार्यांना घायाळ करणारी आवडती सेलिब्रीटी अश्विनी जोशी हिला पुढील वाटचालीसाठी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.
मोहोपाड्यामध्ये नव्याने सुरू झालेले ‘ब्युटी ड्रीम’ मेकअप-हेअर अॅकॅडमी येथील महिलांच्या पसंतीस उतरेल, अशा शब्दांत पेण पंचायत समितीच्या माजी सभापती दर्शना म्हात्रे यांनी मेकअप आर्टीस्ट प्रगती ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुयोग (सोनू ) म्हात्रे याने केले. ‘ब्युटी ड्रीम’ मेकअप-हेअर अॅकॅडमीच्या प्रमुख प्रगती ठाकूर, अंकूश ठाकूर यांनी कार्यक्रमाचे सुरेख नियोजन केले होते.