गुन्हे वृत्त ठाणे

डोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा 

डोंबिवली ( शंकर जाधव ) गुरुवारी सकाळी डोंबिवली पश्चिनेकडील ५२ चाळ परिसरात एका बॅगेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती.विष्णूनगर पोलिसांना याची खबर लागताच ते घटनास्थळी दाखल झाले.सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून ठाण्यातील एका रहिवासी आल्याचे समोर आले आहे.याची हत्या करून मृतदेह बॅगेत भरून डोंबिवलीत टाकल्यात आला.

विष्णूनगर पोलीस ठाण्यातुन मिळालेल्या माहितीनुसार, उमेश पांडुरंग पाटील ( ४०) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते  संतोषी माता सोसायटी, a/ 3 , कोपरी ठाणे येथे राहत होते.4 तारखेला पाटील हे नेहमीप्रमाणे कामावर गेले.मात्र रात्री उशिरापर्यंत घरी आले नसल्याने त्यांच्या घरच्यांनी कोपरी पोलीस ठाण्यात उमेश पाटील हे हरवल्याची नोंद केली.पोलिसांनी त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन तपासले असता ते डोंबिवली शहरात असल्याचे दिसले.त्याचा मृतदेह डोंबिवलीत सापडल्याची माहिती विष्णूनगर पोलिसांनी कोपरी पोलीस ठाण्याला कळवले असता तेथिल पोलिसांनी पाटील यांच्या घरच्यांना याची माहिती दिली.घरच्यांना मृतदेहाची ओळखल पटली असून मृतदेहाच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आहेत.पुढील तपास सुरू असून मारेकऱ्याला लवकरात लवकर अटक करू असे पोलिसांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!