महाराष्ट्र

हिंगणघाट पीडितेच्या मृत्यूमुळे व्यथित; जलद गतीने न्याय मिळण्यासाठी यंत्रणांना निर्देश – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 10 :- हिंगणघाट येथे घडलेली घटना महाराष्ट्रासाठी अश्लाघ्य अशीच आहे. विकृत हल्ल्यात जखमी भगिनी मृत्यूशी झुंजत होती. उपचारांचीही शर्थ केली. पण काळाने घाला घातलाच. या गुन्ह्याचा तपास जलद गतीने होईल आणि खटला जलद गतीने चालविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

या भगिनीच्या कुटुंबियांची व दारोडा गावातील लोकांची मानसिक अवस्था आपण  समजू शकतो.

आरोपीला गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे यासाठी शक्य तितक्या जलद गतीने प्रयत्न करावेत, यासाठी संबंधित यंत्रणांना गतिमान केले आहे. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, यासाठी तपास यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्राला पुरोगामी परंपरा आहे. माता-भगिनींचा सन्मान करणारा प्रदेश म्हणून आपली ओळख आहे. या प्रतिमेला तडा देणाऱ्या या गोष्टींना कदापिही खपवून घेतले जाणार नाही. स्त्री-सन्मानाच्या आपल्या संस्कृतीची घरा-घरात उजळणी करावी लागेल, असेही मुख्यमंत्री म्हणतात.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!