गुन्हे वृत्त

एमएचबी कॉलनी पोलिसांची उत्तम कारवाई ; रिक्षा चोरांच्या टोळीला ठोकल्या बेड्या 24 रिक्षा जप्त

मुंबई : रिक्षा चोरणाऱ्या टोळीला एमएचबी कॉलनी पोलिसांनी बेड्या ठोकल्या या टोळीकडून 24 रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. ही उत्तम कारवाई एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या विशेॊ पथकाने केली. चोरटे रिक्षाच्या

चेसी नंबर, इंजिन नंबर, नंबर प्लेट बदलून चालवायचे. ही टोळी पोलिसांच्या हाती लागल्याने एमएचबी कॉलनी, बोरिवली, समता नगर, चारकोप, कांदिवली पोलीस ठाण्यातील अनेक गुन्हे उघडीकस आले आहेत. त्याशिवाय रिक्षा चोरणाऱ्या टोळीत सहभागी असलेल्या अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचे एमएचबी कॉलनी पोलिसांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून बोरिवली परिसरात रिक्षा चोरीला जाण्याच्या गुन्ह्यांमध्ये कमालीची वाढ झाली होती. सदर बाब लक्षात घेऊन परिमंडळ 11 चे उपायुक्त डॉ. मोहन दहिकर यांनी विशेॊ पथकाची नेमणूक केली. या पथकाचे नेतृत्व एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभागातील पोलीस उपनिरीक्षक विजय धोत्रे करत होते. तपास सुरू असताना विशेष पथकाने रिक्षा चोरीला गेलेल्या ठिकाणी जाऊन बारकाळीने तपास केला. तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला असता पोलिसांना रिक्षा चोरांचा अड्डा समाजला. त्यानुसरर पोलिसांनी मालाड-मालवणी परिसरातून रवी पापा खारवा (35), संजय श्यामलाल चौरसिया (38), सईद अहमद अजिज उल्ला सईद यांच्या मुसक्या आवळल्या. या आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी रिक्षा चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी 24 रिक्षी जप्त केल्या. या आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता 13 फेब्रुवारी रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
रिक्षा चोर टोळीचा पर्दाफाश अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत, परिमंडळ 11 चे उपायुक्त डॉ. मोहन दहीकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील वडके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित ठाकरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) धनंजय लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उरनिरीक्षक विजय धोत्रे, हवालदार जोपळे, पोना मोरे, पोशि काळे, पोशि भागवत आदी पथकाने केला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!