महाराष्ट्र

दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठीचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे तात्काळ सादर करण्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

मुंबई, दि. 12 : दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी केंद्र पुरस्कृत योजनांचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे तात्काळ सादर करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

केंद्र पुरस्कृत योजनांचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यासाठीच्या राज्यस्तरीय समितीची बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी श्री.मुंडे बोलत होते.

श्री.मुंडे म्हणाले, केंद्र पुरस्कृत दीनदयाळ दिव्यांग पुनर्वसन योजनेंतर्गत दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत विविध प्रकल्प राबविण्यात येतात तसेच दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने वाटप या योजनेंतर्गत स्वयंसेवी संस्थामार्फत दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरविण्यात येतात.

SIPDA-Scheme for Implementation of Rights of Persons with Disabilities Act, 2016 या योजनेंतर्गत राज्यातील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रांमार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी विविध सेवासुविधा, विविध थेरपी, सर्वेक्षण, विविध योजनांसाठी समुपदेशन व मदत करणे, जनजागृती करणे, त्वरित निदान व शीघ्र हस्तक्षेप, शिबिरांचे आयोजन करुन सहाय्यक साधने पुरविणे, शासन व धर्मादाय संस्थांच्या मदतीने सर्जिकलविषयक सुविधा, विविध प्रशिक्षण इ.सेवा व सुविधा पुरविण्यात येतात.

यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव पराग जैन, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार आदी अधिकारी उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!