ठाणे

पाच दिवसाच्या आठवड्याबाबत  समाजातील विविध घटकांच्या  सकारात्मक प्रतिक्रीया

ठाणे दि.13  :राज्यातील शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचे  समाजातील विविध घटकांकडून  स्वागत करण्यात आले आहे.

दिपाली महाले समन्वयक महिला संघटना म्हणतात  पांच दिवसांच्या आठवड्याबरोबर कामाचा वेळ पण वाढणार आहे. पण कर्मचाऱ्यांना  यांचा खुप फायदा होईल. जाण्यायेण्याचा प्रवास खर्च,वेळ,वीज,पाणी यांची बचत होईल.तसा केंद्र सरकारला पण पाच दिवसांचा आठवडा आहेच.त्यामुळे अधिकारी कर्मचारी यांची कार्यशक्ती वाढेल.

आशिष येरावार ( सामान्य नागरिक)#चांगला_निर्णय.

निर्णय पूर्णपणे वाचल्यानंतर समजते की, वर्षभरातील कामकाजाचे एकूण तास वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसाचा आठवडा लागू करून नक्कीच कामकाजाच्या वेळेतून कोणतीही सवलत दिलेली नाही.

ललित अग्रवाल (व्यावसायिक )पण हे कामावर अवलंबून  आहे. प्रकरणे जर जास्त असतील तर सरकारी कर्मचारी रविवारी सुद्धा  काम करताना आणि रात्री अपरात्री सुध्दा  काम करताना पाहिलेत. रोज जरी रात्री 8 पर्यंत काम केलं (9:30-10 official timing) तरी काम संपत नाही म्हणून रविवारी सुट्टी असली तरी काम करावे  लागते . चांगला निर्णय आहे.

अक्षय बैसाने पत्रकार निर्णय चांगला आहे परंतु सर्व कर्मचारी  निणर्य इतर दिवसांसाठी दिलेल्या कामाच्या वेळेचे किती काटेकोर पणे पालन करतील यावर हा निर्णय यशस्वी ठरेल.

मुक्ता लोंढे पत्रकार या निर्णयाचे मी स्वागत करते.कारण या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर कामाच्या वेळे मध्ये बदल झाल्याने ट्रेन च्या प्रवासातील गर्दी थोड्या प्रमाणात तरी कमी झाल्याचे पहायला मिळेल.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!