डोंबिवली ( प्रतिनिधी )- शहरासाठी चांगल्या गोष्टी करण्याचा सातत्याने प्रयत्न करणार, असे उदगार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी आज काढले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकचे आयुक्त गोविंद बोडके यांचेकडून पदभार स्विकारल्यानंतर आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे उदगार काढले. ” कल्याण डोंबिवली महानगरपालिका सुंदर, स्वच्छ, नागरी महापालिकेचे एकच लक्ष” हेच उदि्दष्टय बाळगून काम करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विविध प्रश्न उदा. कचरा, डंम्पींग ग्राऊंड, वाहतूक समस्या इ. विषयांचा अभ्यास करुन प्रगती करण्याची दिशा ठरविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महापालिका आयुक्त म्हणून काम करत असतांना सर्वांचे सहकार्यही तितकेच महत्वाचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत रुजू होण्यापूर्वी डॉ. विजय सुर्यवंशी हे जिल्हाधिकारी रायगड या पदावर कार्यरत होते.